आपल्या मानवांमध्ये अनेक कौशल्ये आहेत, हे आपल्या सर्वांना माहित आहे.परंतु, जर तुम्हाला प्राण्यांमध्ये मानवांची कौशल्ये पाहायला मिळाली तर तुम्हाला कसे वाटेल? त्याहूनही, जर दोन प्राण्यांनी ते कौशल्य एकत्र दाखवले तर? मानवांप्रमाणेच प्राणी देखील पराक्रम करण्यात अतिशय पटाईत आहेत. तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला त्याच्या कोणत्याही कौशल्याचा विश्वविक्रम करताना पाहिले आहे का? जर तुम्ही ते पाहिले नसेल, तर तुम्ही आता नक्की पहाल. कारण कुत्रा आणि मांजर यांचा एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोघेही एकत्र स्कूटर चालवताना दिसत आहेत. त्याहून विशेष गोष्ट म्हणजे दोघांनी मिळून स्कूटर चालवून विश्वविक्रम केला आहे. हा व्हिडीओ पाहणे खूप मजेदार आहे.

असा केला विश्वविक्रम

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (GWR) ने त्याच्या इन्स्टाग्रामवर कुत्रा आणि मांजरीच्या रेकॉर्डचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुत्रा आणि मांजर दोघेही एकाच स्कूटरवर स्वार होऊन आनंदाने स्कूटर चालवत आहेत. थोड्याच वेळात, हे दोघेही सायकल चालवताना आणि कार चालवताना दिसतात. एवढेच नाही तर दोघेही एका बाईसोबत बसून पुस्तक वाचताना दिसतात.

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
future players in indian cricket team
विश्लेषण : टीम इंडिया ‘जनरेशन नेक्स्ट’ कशी असेल?
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स (जीडब्ल्यूआर) ने म्हटले आहे की सशिमी आणि लॉलीपॉप ४.३७ सेकंदात हा पराक्रम करताना दाखवले आहेत. “प्रतिभाशाली #GWR2022 या पुस्तकातील सशिमी (७ वर्षांची बंगाल मांजर) आणि लॉलीपॉप (५ वर्षांची बोस्टन टेरियर) स्टार सर्वोत्तम मित्र आहेत. लॉलीपॉप आणि सशिमी या दोघांचा एकट्याने स्कूटरचा आनंद घेताना पाच मीटर स्कूटर चालवण्याचा अनोखा विक्रम त्याच्या नावी झाला आहे.

नेटीझन्सने केलं कौतुक

लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. लोक व्हिडीओवर कमेंट करत आहेत. एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, “हे खूप गोंडस आहे,” लोकांना हा व्हिडीओ जास्त आवडत आहे कारण कुत्रा आणि मांजर यांच्यात इतकी खोल मैत्री कोणी पाहिली नाही.

तुम्हाला कसा वाटला हा विश्वविक्रम?