लहान मुलाच्या आधी कुत्राच शिकला ‘आई’ बोलायला; व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

हा व्हिडीओ १४३ हजाराहून जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि नेटिझन्सने या कुत्र्याच्या हुशारीचे कौतुक करत असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

dog learned to speak
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @GoodNewsCorres1/ Twitter )

कुत्रा हा प्राणी बहुतेक सर्वांना आवडतात. ते केवळ गोंडसच नाहीत तर ते हुशार आणि बुद्धिमान देखील आहेत! होय, आम्ही अशा पाळीव कुत्र्यांबद्दल बोलत आहोत जे शेपूट हलवून कोणाचाही दिवस सुंदर करतात. सोशल मीडियावर अनेकदा कुत्र्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. लोकांना हृदयाला स्पर्श करणारे व्हिडीओ देखील खूप आवडतात. आता या एका लहान मुलाचा आणि कुत्र्याचा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.

काय आहे व्हिडीओमध्ये?

गुड न्यूजच्या प्रतिनिधीने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मूल आणि एक कुत्रा एकत्र बसलेले दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे पालक लहान मुलाला ‘मामा’ (आई) हा शब्द बोलण्यास सांगतात. अगदी लहान मुलाला खायला देऊन ते आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करतात. पण, मुलाने उत्तर देण्याआधीच कुत्राचं ‘मामा’ असं बोलतो. व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मुलाचे पालक आपल्या मुलाकडून ‘आई’ म्हणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याऐवजी, जेव्हा त्यांचा कुत्रा प्रथम म्हणतो तेव्हा ते हसतात. तो हुशार कुत्रा आहे!’

(हे ही वाचा: Viral: तामिळनाडूमध्ये पावसात दोन सापांचा डान्स; झोहोच्या सीईओने शेअर केला व्हिडीओ )

व्हिडीओ १४३ हजाराहून जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि नेटिझन्सने यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कुत्रा किती हुशार आहे याकडे लक्ष वेधले तर काहींनी प्रत्येक मुलाने कुत्र्यासोबतच मोठं झालं पाहिजे असे मत व्यक्त केले.

( हे ही वाचा: Viral Video: स्पॅनिश मधलं भुताचं गाव बघितलं का? ३० वर्षापासून होतं पाण्याखाली )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट केली, ‘हा एक अप्रतिम व्हिडीओ आहे’ दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘मी असा व्हिडीओ याआधी कधीच पाहिला नाही आणि कोणाच्या घरात इतका चांगला कुत्रा आहे’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘हे असे दिसते की त्याच्या कुटुंबाने त्याला चांगले प्रशिक्षण दिले आहे, तो एक अतिशय हुशार कुत्रा आहे’.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The dog learned to speak mother before the child just watch the viral video once ttg

Next Story
Viral Video: स्पेन मधलं भुताचं गाव बघितलं का? ३० वर्षापासून होतं पाण्याखाली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी