आजकाल सोशल मीडियावर अनेक स्टंट करणाऱ्या लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधील काही काही स्टंटतर अगदी जीवघेणे असतात. शिवाय अशा स्टंटमुळे अनेकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागल्याचंही आपण पाहिलं आहे. सध्या अशाच एका हेवी ड्रायव्हरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाय हा व्हिडीओ पाहिल्यानंतरही अनेकांना त्यावर विश्वास ठेवणं कठीण होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या धक्कादायक स्टंटचा व्हिडीओ आकाश चोप्रानेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ एखाद्या सिनेमातील सीनप्रमाणे दिसत आहे. कारण असे धोकादायक सीन प्रत्येक्षात करणं अशक्य आहे. पण एका व्यक्तीने असा सीन प्रत्येक्षात केला आहे. जो सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील व्यक्तीने एका भरधाव ट्रकच्या खालून आपली कार पार केली आहे. हो, कदाचित तुम्हाला यावर विश्वास ठेवणं कठीण होईल पण असं प्रत्येक्षात एका व्यक्तीने केलं आहे. जे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.
आकाश चोप्राने हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “हे कसे करता यार” याशिवाय, व्हिडीओत बोलताना तो धक्कादायक एक्सप्रेशन देताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एका मोठ्या ट्रकजवळ एक स्पोर्ट्स कार धावताना दिसत आहे. दोघांचा वेग जवळपास समान आहे. अचानक ड्रायव्हर डावीकडे धावणारी कार ट्रकखाली घेतो आणि काही सेकंदातच उजवीकडे बाहेर काढतो. या व्यक्तीचा धोकादायक स्टंट पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या व्यक्तीचं कौतुक केलं आहे, तर काही लोकांनी अशा धोकादायक स्टंटमुळे त्या व्यक्तीवर टीकाही केली आहे. एका नेटकऱ्यांने लिहलं आहे की, ‘भाऊ, वेगात थोडी चूक झाली तर गाडी ट्रकखाली गेली असती आणि तुझा खेळ संपला असता’ तर आणखी एकाने लिहिले आहे, ‘ऋषभ पंत’ अशा प्रतिक्रिया लोकांनी व्हिडीओवर दिल्या आहेत.