Shocking video: गाडी चालवायला सगळ्यांनाच आवडतं. तर काही लोकांचं गाडी चालवणं हे स्वप्नही असतं. तुम्हीही बऱ्याच वेळा एकलं असेल की गाडी चालवणं सोपं असतं पण योग्य पद्धतीत गाडी पार्क कर करणं किंवा युटर्न घेणं तसं कठीण असतं. काहीवेळा गाडी अशा जागेत अडकते की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होते. त्यामुळे अशा रस्त्यांवर सतत अपघात किंवा गाड्या कोसळल्याच्या घटना समोर येत असतात. अशीच भयानक घटना समोर आलाीय ज्यामध्ये डोंगरावरुन कार खाली कोसळली. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती…

‘अतिघाई संकटात नेई’ असे म्हणतात. याचाच प्रत्यय आला आहे. काहीवेळा लोक घाई गडबडीत अशा चुका करतात की ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक अपघात शॉर्टकट मारताना झाला आहे. आणि हाच शॉर्टकट जीवावर बेतला आहे, या अपघाताचा सीसीटिव्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अपघतात दोघेही पती-पत्नी हवेत उडाले आहेत.

नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, डोंगराळ रस्त्यावर कारचं नियंत्रण सुटून ती खाली कोसळू लागली. काही लोक कार वर ढकल्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना हे शक्य होत नाही आणि कार खाली कोसळू लागते. गाडीत एक ड्रायव्हर बसल्याचं दिसतंय. गाडी कोसळू लागताच तो योग्य वेळी बाहेर उडी मारतो. त्यामुळे त्याचा जीव वाचतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “मित्रा ‘हे’ वाक्य नंतर खूप त्रास देईल” स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना हे वाक्य समोर असावंच; स्टडी टेबलचा PHOTO व्हायरल

रोज किती अपघात होतात, यामध्ये काहींचा जागेवरच मृत्यू होतो. तर काही जखमी होतात. मात्र कधी कधी म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती…अशाप्रकारे मोठ्या भिषण अघातातूनही काहीजण वाचतात. आणि विशेष म्हणजे त्याला कुठलीही इजा झाली नाही. गाडी अंगावरून गेल्यानंतर चक्क तो उभा राहिला. सोशल मीडियावर हा व्हि़डीओ तुफान व्हायरल झाला असून @Prateek34381357 नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.