सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओत एक भीषण अपघात दिसत आहे. भरधाव वेगाने जाणारी कार आणि ट्रॅक्टरची धडक पाहून लोकांना धक्काच बसला आहे. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. त्याचबरोबर ट्रॅक्टर चालकाचा जीवही मोठ्या मुश्किलीने वाचला आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही ही सुदैवाची बाब होती. परंतु ट्रॅक्टर चालकाला निश्चितच मोठा फटका बसला. अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
एक ट्रॅक्टर चालक आपल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह कच्च्या रस्त्यावरून पक्क्या रस्त्याकडे येत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. ट्रॉलीमध्ये बरेच सामान आणि काही लोक बसले आहेत. ट्रॅक्टर चालक गाडी न पाहताच रस्त्यावर येतो. तोच कार चालकही, कारचा वेग जास्त असल्याने ट्रॅक्टर पाहून थांबू शकत नाही. त्यामुळे दोघांमध्ये भीषण टक्कर होते. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले.




ट्रॅक्टर आणि कारच्या या भीषण धडकेनंतर ट्रॅक्टर चालक सुखरूप आहे. त्याचवेळी ट्रॉलीवरील कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर कार चालक तात्काळ तेथून पळून जातो. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आता कांदा कापताना येणार नाहीत डोळ्यातून अश्रू; महिलेने शोधून काढली आगळी वेगळी ट्रिक
व्हिडीओ पाहून लोक नाराजी व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. हा व्हिडीओ आतापर्यंत ११ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला ६३ हजारांहून अधिक लोकांनी लाइकही केले आहे.