scorecardresearch

पाण्यात बुडणाऱ्या आपल्या मुलाचे धाडसाने वाचवले हत्तीने प्राण; हृदयस्पर्शी Video Viral

या व्हिडीओला आतापर्यंत २२ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Elephant video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: elephants_.world / Insatgram)

अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हृदयाला भिडतात तर काही चकित करतात. सोशल मीडियावर अनेकदा वन्य प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहिले जातात आणि खूप पसंत केले जातात. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्याला पाहून प्रत्येकजण भावूक होत आहे. व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावताना दिसत आहे.

अनेकदा असे दिसून आले आहे की हत्तीच्या ग्रुपमधील कोणताही एक सदस्य संकटात सापडला की प्रत्येक सदस्य त्याच्या मदतीसाठी पुढे येतो. अशा परिस्थितीत या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सर्वप्रथम, व्हिडिओमध्ये हत्तींचा समूह दिसत आहे, जो नदी ओलांडत आहे. दरम्यान, हत्तीचे बाळ अचानक नदीत वाहू लागते. आपल्या मुलाला नदीत वाहून जाण्यापासून वाचवण्यासाठी त्याची आई पटकन पाठी जाऊन सोंडेने त्याला वाचवते. यादरम्यान हत्तींचा संपूर्ण कळप हत्तीला मदत करताना दिसतो.

(हे ही वाचा: सुंदरबनमधील वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा Viral Video एकदा बघाच!)

(हे ही वाचा: सुंदरबनमधील वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा Viral Video एकदा बघाच!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. व्हिडीओ पाहून युजर्स भावूक होत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत २२ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यावर यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The elephant bravely saved life of his son who was drowning heartbreaking video viral ttg

ताज्या बातम्या