the emotional video of the father who came to say goodbye to his son at railway station goes on viral | Loksatta

“बाप तो बापच” रेल्वे स्टेशनवर मुलाला निरोप द्यायला आलेल्या वडिलांचा भावूक Video पाहून नेटकरीही भारावले

मुलाबद्दलची काळजी दाखवणारा वडिलांचा हा व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप भावूक करत आहे.

father drops son at railway station
वडील मुलावर असणारं प्रेम उघड करत नाहीत मात्र, त्यांच्या एखाद्या कृतीवरुन ते सिद्ध होत असतं. (Photo : Instagram)

वडील आणि मुलगा यांच्यातील नातं काही वेगळच असतं, भारतीय वडील आणि मुलांबाबतचे अनेक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये विशेषत: वडिलांनी आपल्या मुलाला कोणत्यातरी कारणामुळे मारल्याचं किंवा ओरडल्याचं दाखवलं जातं. शिवाय मुलाच्या तुलणेत वडिलांचं मुलीवर जास्त प्रेम असल्याचंही या व्हायरल व्हिडीओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.

पण खरंतर वडिलांचा आपल्या मुलावरही मुलीएवढेच प्रेम असतं. मात्र, ते व्यक्त करत नाहीत. ते आपल प्रेम उघड करत नसले तरी त्यांच्या एखाद्या कृतीवरुन ते सिद्ध होत असतं. शिवाय आपला मुलगा घरापासून दूर रहात असेल तर वडील थोडे जास्तच हळवे होत असतात. सध्या अशाच एका हळव्या वडिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून अनेक मुलांना त्यांच्या वडिलांसोबतच्या नात्याची आठवण होत आहे. पवन शर्मा नावाच्या एका तरुणाने वडिलांसोबतचा एक व्हिजीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो पाहून अनेकजण भावनिक झाले आहेत.

हेही वाचा – तरुणाने चक्क शेणापासून कमावले लाखो रुपये, चपलांसह अनेक सजावटीच्या वस्तू बनवण्याचा सुरु केला व्यवसाय

असं म्हणतात की, मुलं कितीही मोठी झाली तरी आई-वडिलांसाठी ती नेहमी लहानच असतात. मुलाबद्दलची काळजी दाखवणारा हा वडिलांचा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप भावूक करत आहे. तुम्ही जेव्हा कधी एकटे प्रवासासाठी जाणार असता त्यावेळी तुम्हाला घरचे लोक रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टॉपपर्यंत सोडायला येतात. सध्या असंच आपल्या मुलाला रेल्वे स्थानकावर पोहचवण्यासाठी आलेल्या एका वडिलांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते आपल्या मुलाला रेल्वेमधून जाताना ते त्याच्याकडे पाहत पाहत चालताना दिसत आहेत. शिवाय जोपर्यंत मुलगा नजरेआड होत नाही तोपर्यंत ते चालतच असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हेही पाहा- धीरेंद्र कृष्ण महाराजांचा नवा अवतार आला समोर; व्हायरल Video पाहताच समर्थक म्हणाले, “गुरुदेव पुन्हा…”

हा व्हिजीओ pwn.sharma नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये वडील आपल्या मुलाला रेल्वे स्टेशनवर सोडयाला आल्याचं दिसत आहेत. ऑक्टोबरमध्ये शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “प्रत्येक वेळी माझे बाबा मला सोडायला येतात आणि मी नजरेआड होईपर्यंत ते माझ्याबरोबर चालतात आणि ते प्रत्येक वेळी ते भावनिक होतात” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका नेटकऱ्याने ‘शेवटी बाप तो बापच असतो’ म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, भावा तुझा या पोस्टमुळे मला माझा कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली जेव्हा मला वडील सोडायला यायचे. अशा अनेक भावनिक कमेंट या व्हिडीओवर येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 12:42 IST
Next Story
स्विगीवरुन सॅनिटरी पॅड्स मागवले आणि बॉक्समध्ये सापडल्या भलत्याच गोष्टी; मुलीचे ‘ते’ ट्विट Viral