scorecardresearch

Premium

ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…

टोल नाक्यावर पैसे न देता निघून जाणाऱ्या ट्रकचालकाकडून टोल घेण्यासाठी कर्मचारी मजेशीर पद्धतीने पाठलाग करताना दिसून आला आहे.

The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
(सौजन्य:ट्विटर/@gharkekalesh) ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…

Viral Video : महामार्गावरून‌ प्रवास करत असताना‌ तुम्हाला काही ठिकाणी वाहन थांबवून टोल द्यावे लागतात. पण, टोलनाक्यावर गाड्यांची प्रचंड रांग लागलेली असते. यामुळे टोल नाक्यावर टोल भरण्यास जास्त वेळ लागतो. हे पाहून काहीजण टोल नाक्यावर पैसे न भरताच पुढे निघून जातात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. टोल नाक्यावर पैसे न देता निघून जाणाऱ्या ट्रकचालकाकडून टोल घेण्यासाठी कर्मचारी मजेशीर पद्धतीने पाठलाग करताना दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडीओ ट्रकचालक आणि टोलनाक्यावर टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा आहे. टोलनाक्यावर पैसे न देता एक ट्रकचालक निघून जातो. हे बघताच टोल घेणारा कर्मचारी चालत्या ट्रकवर चढतो. ट्रकचालक वेगात ट्रक घेऊन जातो आहे आणि कर्मचारी ट्रकच्या दरवाजावर लटकताना दिसत आहे. टोल घेणारा कर्मचारी ट्रक चालकास गाडी बाजूला थांबवण्यास सांगतो आहे, पण ट्रकचालक त्याचं ऐकत नाही आणि दादागिरी करण्यास सुरुवात करतो आणि त्यांचा मजेशीर संवाद रंगतो. टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा आणि ट्रकचालकाचा मजेशीर व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

Drummer puts cure code scanner on drum to collect money
ढोलक वाजवणारा झाला डिजिटल… पैसे घेण्यासाठी लावला क्यूआर कोड स्कॅनर
Hungry Children Baby In Desert Human Life In Africa Emotional Video Viral
ही रांग iPhone 15 घेण्यासाठीची नाही! एकवेळच्या अन्नासाठी आहे; Video पाहून मन अक्षरशः भरून येईल
In the world of dating apps young women use unique idea to find a partner
Video : डेटिंग अ‍ॅपच्या विश्वात तरुणी जोडीदार शोधायला उतरली रस्त्यावर
schoolboy throws notes for help from window in bid to escape doing homework
गृहपाठ न करण्यासाठी वापरलेल्या युक्तीमुळे पोलिस थेट पोहोचले घरी; पालकांना बसला धक्का!

हेही वाचा… धक्कादायक! गुजरातमध्ये आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू, घटनेचा VIDEO व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

टोल घेण्यासाठी चढला चालत्या ट्रकवर :

एक टोल कर्मचारी ट्रकचालकाच्या गाडीला लटकून त्याच्याकडे टोल देण्याची मागणी करताना दिसून येत आहे. टोल मागणारा कर्मचारी ट्रकचालकाला गाडी थांबवण्यास सांगतो; पण ट्रकचालक त्याच्या गाडीवर कर्मचारी चढला म्हणून तुझ्या बापाची गाडी आहे का? तू गाडीला लटकून चोरी करण्याचा प्रयत्न करतो आहेस का? तुझा व्हिडीओ बनवू का मी… अशा शब्दात ट्रकचालक टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याला ऐकवताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरून अनेक मजेशीर व्हिडीओ नेहमीच शेअर केले जातात. तर आता टोल न देणारा ट्रकचालक आणि टोल घेण्यासाठी ट्रकला लटकणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकजण टोल कर्मचारी आहे की, बँकेचा रिकव्हरी एजेंट आहे असे म्हणताना दिसत आहेत. तर अनेकजण मजेशीर प्रतिक्रिया देताना कमेंटमध्ये दिसून येत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The employee boarded the truck to collect the toll from the truck driver asp

First published on: 29-09-2023 at 21:02 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×