या २५ वर्षीय महिलेने दावा केला आहे की, तिला न सांगता नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. ही महिला कर्मचारी एका सुपरमार्केटमध्ये काम करायची आणि अचानक कामावरून काढून टाकल्याच्या बातमीने ती थोडी अस्वस्थ झाली.

या महिलेने बॉसला धडा शिकवण्यासाठी त्याचे खूप नुकसान केले. तिने सुपरमार्केटमध्ये एवढा विध्वंस झाला की ज्यांनी कोणी हा व्हिडीओ पाहिला आहे त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

प्रथमदर्शी हे एक वाईन शॉप वाटते. यावेळी या महिलेच्या हातात जी बाटली येत होती, ती जमिनीवर आपटून ती फोडत होती. हे दृश्य आणि तिचा राग पाहून नेटकरीही थोडे घाबरले आहेत. तिचा संयम गमावल्याने, तिला कदाचित कल्पनाही नव्हती की ती जे काही करत आहे ते तिलाही दुखवू शकते. ती महागड्या महागड्या दारूच्या बाटल्या कशा फोडत आहे, हे सीसीटीव्हीत दिसत आहे.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

@PolicialesON या ट्विटर अकाऊंटवरून हा विडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी असा गोंधळ घातल्याप्रकरणी महिलेलाही अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. आपण जे काही केले ते योग्य नाही हे महिलेने मान्य केले. आता नोकरीवर येण्याची गरज नाही, बॉसच्या या बोलण्याने महिलेला चांगलाच राग आला होता.