जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रशासनाने मोठा पुढाकार घेतला आहे. अनेक उपक्रम तिकडे राबले जात आहेत. श्रीनगरच्या प्रसिद्ध दल तलावात प्रथमच ओपन एअर फ्लोटिंग थिएटर सुरू झाले आहे. या ओपन एअर फ्लोटिंग थिएटरचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव अरुणकुमार मेहता यांच्या हस्ते या थिएटरचे उद्घाटन करण्यात आले.
जम्मू-काश्मीरमध्ये बऱ्याच काळानंतर सिनेमाची सुरुवात

हे थिएटर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे आता काश्मीरमध्ये पुन्हा सिनेमा सुरू होणार आहे, कारण जम्मू-काश्मीरमध्ये बऱ्याच दिवसांपासून चित्रपटगृहे बंद आहेत. बॉलिवूड चित्रपट निर्माते काश्मीरला छायाचित्रकारांचे नंदनवन म्हणतात.

( हे ही वाचा: “पुनीत राजकुमार यांचे ‘ते’ शब्द खरे ठरले”, चाहत्यांना भावना अनावर, चित्रपटातील संवादाचा व्हिडीओ व्हायरल! )

लॉंच प्रसंगी दाखवला ‘काश्मीर की कली’ चित्रपट

ओपन-एअर फ्लोटिंग थिएटरच्या शुभारंभाच्या प्रसंगी, दल सरोवर पूर्णपणे चमकणाऱ्या दिव्यांनी न्हाऊन निघालेले दिसले. या प्रसंगी, एक रंगीबेरंगी रोषणाई केलेली शिकारा रॅली नेहरू पार्क मार्गे कबूतरखानापर्यंत केलीगेली होती, स्थानिक कलाकारांनी काश्मिरी गाणी गायली आणि त्यावर नृत्य केलं, ज्याने पाहुण्यांचे आणि पर्यटकांचे मनोरंजन केले. यावेळी पर्यटक आणि स्थानिक लोकांना ‘काश्मीर की कली’ हा बॉलिवूड चित्रपट दाखवण्यात आला.

( हे ही वाचा: Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” )

येत्या काळात देशातून आणि जगातील लोक जम्मू-काश्मीरमध्ये येतील

जम्मू आणि काश्मीर सरकारचे पर्यटन आणि संस्कृती सचिव सरमद हाफीज म्हणाले की, ओपन एअर फ्लोटिंग थिएटरमुळे राज्यातील पर्यटनाला फायदा होईल. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, “संध्याकाळच्या एक्टिविटजबाबत आमच्याकडे खूप मागणी आहेत.त्याचा काश्मीरमधील पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे. या थिएटरचा शिकारा, हाऊसबोट मालक, हॉटेल उद्योग खुलेआम पर्यटकांचे स्वागत करत आहे. ते म्हणाले की, आता थंडीचा हंगाम हळूहळू येत आहे, त्यामुळे देशातील आणि जगातील लोक जम्मू-काश्मीरला भेट देतील अशी अपेक्षा आहे.