Frog and snake video: बेडूक आणि साप हे एकमेकांचे पक्के वैरी मानले जातात. साप बेडकाला खातो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. म्हणून बेडूक सापापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. पण एका बेडकाने अशी हिंमत दाखवली आहे. की तुम्ही व्हिडिओ पाहून थक्क व्हाल. निसर्गाचे नियम वेगळे असतात. येथे बेडुक हे सापांचे आवडते खाद्य मानले जाते. मात्र बेडकाला कधी सापाला खाताना पाहिलयं का? आपल्या शत्रूशी पंगा कधीच घेऊन नये, असं म्हणतात. पण बेडकाने आपल्या कट्टर शत्रूशी सापाशी पंगा घेण्याचं धाडस केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हिडिओने सर्वजण थक्क झाले आहेत. यामध्ये एका बेडकाने सापाला गिळले आहे. बेडकाला कदाचित माहित नसेल की मृत्यूच्या दारात जात असावा. बेडकाने कसलाही विचार न करता सापाला जिवंत गिळलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच हा व्हिडीओ ज्या व्यक्तीने केलाय त्याचा व्हिडीओसुद्दा वायरल होत आहे. आपल्या पायांनी बेडकाने सापाला आपल्याकडे ओढत खाऊन टाकले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले येथील होडावडे गावात ही घटना घडली आहे. हे अचंबित करणारे दृश्य वन्यजीव अभ्यासक मंगेश माणगावकर यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केले आहे. एका इंडियन बूल फ्रॉग प्रजातीच्या बेडकाने सापाला गिळले आहे.

इंडियन बुल फ्रॉग हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा सर्वात मोठा बेडूक आहे. या बेडकाची लांबी १७० मिलीमीटर म्हणजे ६.७ इंचापर्यंत वाढते. हा बेडूक हिरव्या आणि तपकिरी रंगात आढळतो. भक्षक स्वाभावासाठी ओळखला जाणाऱ्या या बेडकाने नानेटी या बिनविषारी सापाला गिळल्याचे दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. हा बेडूक किटक, सरजडे, पाली, लहान साप, लहान पक्षी यांसारख्या प्राण्यांना खातो. हा बेडूक पाणथळ भागांमध्ये आढळून येतो. पावळ्याच्या काळात प्रजननासाठी बेडूक एकत्र येतात

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @atulkamble123 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.