आजकाल अनेक तरुणांना सोशल मीडियावर फेमस होण्याचे वेड लागलं आहे. त्यासाठी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात ते सतत वेगवेगळे स्टंट करण्याचा प्रयत्न करत असतात. शिवाय अशा तरुणांचे स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ आपण पाहत असतो. मात्र असे स्टंट करणं अनेकांच्या अंगलट आल्याचही आपण पाहिलं आहे. सध्या अशाच एका मुलीचा स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रेस्टॉरंटमध्ये ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर स्टंट करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्टंट करत असताना तिचा तोल गेल्याने ती जोरात जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. यावेळी ती अत्यंत वाईतरित्या तोंडावर आपटल्याचंही दिसत आहे. तर असला भलता स्टंट करण्याची काय गरज होती? असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आपलं हसू आवरणं कठिण होत आहे.

With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
raman bhalla
काश्मीर खोऱ्यातील लढतींची उत्सुकता
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक

हेही पाहा- Photo Viral: महाशिवात्रीनिमित्त मुकेश अंबानी यांनी सोमनाथ मंदिराला दिली कोट्यवधींची देणगी

तोंडावर आपटली –

सध्या स्टंट करताना मुलीची फजिती झाल्याचा व्हिडीओ parulll_2000 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी प्लास्टिकच्या दोन खुर्च्यांवर स्टंट करताना दिसत आहे. यादरम्यान मुलीचा समतोल बिघडल्याने आणि ती तोंडावर आपटते. मुलगी खाली पडताच तिथे उपस्थित असलेला तिचा एक मित्र तिच्या मजतीसाठी आल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

नेटकऱ्यांनी केलं ट्रोल –

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत तो ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहीला आहे. तर त्याला५ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘पापाची परी उडून गेली’. तर दुसऱ्या यूजरने, हा मुलीचा दोष नाही तर खुर्चीचा आहे.’ अशी कमेंट केली आहे.