scorecardresearch

सायकल घेऊन उंच टेकडीवरून मुलीने मारली उडी; हा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

या व्हिडीओमध्ये एक मुलगी उंच डोंगरावरून सायकल घेऊन खाली उडी मारताना दिसते. हा व्हिडीओ बघून तुमच्या काळजातही धस्स होईल.

हे दृश्य थक्क करणारं आहे. (Photo : Instagram/@beautifuldestinations)

आपण बहुतेक चित्रपटांमध्ये अनेक स्टंट्स बघत असतो. हे स्टंट्स पाहून आपल्याला भीती वाटते. परंतु हे स्टंट्स सर्व गोष्टींची काळजी घेऊन केले जातात. परंतु तुम्ही वास्तविक जीवनात असे स्टंट्स कधी पाहिले आहेत का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी उंच डोंगरावरून सायकल घेऊन खाली उडी मारताना दिसते. हा व्हिडीओ बघून तुमच्या काळजातही धस्स होईल.

व्हिडीओमधील मुलीला सायकलसोबत असे स्टंट्स करताना बघून तुम्ही हैराण व्हाल. तुम्ही क्वचितच असा स्टंट आधी कधी पाहिला असेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक मुलगी सायकल घेऊन एका डोंगरावर उभी आहे. तिच्या बाजूला आणखी एक मुलगी उभी आहे. तेव्हाच सायकलवरील मुलगी वेगाने सायकल घेऊन पुढे आली आणि तिने डोंगरावरून उडी मारली. हे दृश्य थक्क करणारं आहे.

एलियनमुळे महिला गरोदर! अमेरिकच्या संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात धक्कादायक खुलासा

व्हिडीओमध्ये आपण पुढेच पाहू शकतो की, टेकडीवरून उडी मारल्यानंतर मुलगी सुखरूप जमिनीवर पोहोचते. यानंतर, ती वेगाने सायकल चालवते आणि समोर दिसणारी दुसरी टेकडी चढते. ज्याप्रकारे ही मुलगी एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीवर जाते हे पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. ती जी टेकडी चढते ती अतिशय उंच टेकडी आहे. उंच ठिकाणी चढणे इतके सोपे नसले तरीही या मुलीसाठी हे अगदी सोपे दिसत आहे.

Viral Video : पठ्ठ्याने विगच्या आत लपवलं होतं ‘इतक्या’ लाखांचं सोनं; कसा सापडला पोलिसांच्या जाळ्यात? पाहा…

व्हिडीओ पाहून असे अजिबात वाटत नाही की हा स्टंट करताना या मुलीला जराही भीती वाटत असावी. हा धक्कादायक व्हिडीओ beautifuldestinations नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की आतापर्यंत या व्हिडीओला ९५ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर, ६१ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The girl jumped off a high hill with a bicycle you too will be shocked by watching this viral video pvp

ताज्या बातम्या