Viral video: लहान मुलं कुठेही खेळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना त्यांच्यावर सतत लक्ष ठेवायला लागतं. लहान असल्यामुळे त्यांना कोणती गोष्ट त्यांच्यासाठी धोकादायक आहे हे लक्षात येत नाही. यामुळे ते अनेकदा चुकीच्या गोष्टींसोबत खेळण्याचा प्रयत्न करतात आणि अडचणीत सापडतात. थोड्यावेळासाठी पालकांचं लक्ष दुसरीकडे गेलं तरी हे चिमुकले काहीतरी कारनामा करतात. मात्र कधी कधी हे लहान मुलांच्या जीवावरही बेततं. तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. अलीकडच्या काळात आई-वडील आपापल्या कामात व्यग्र असतात. परिणामत: कित्येकदा त्यांचे लहान मुलांकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्याचे प्रसंग अनेकदा समोर आले आहेत.अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ समोर आला आहे. खेळताना या मुलीचा पाय कढईमध्ये अडकला. कढईला जे वर्तुळाकार कान असतात त्यामध्ये तिनं आपला पाय अडकला. त्यानंतर पुढे काय झालं तुम्हीच पाहा.

घरात लहान मूल असेल, तर आपल्याला सतत सावध राहावं लागतं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लहान बाळं रांगताना, अगदी चालायला लागल्यावरही हाताला मिळेल ती प्रत्येक गोष्ट तोंडात घालतात. त्यामध्ये अनेकदा कागद, प्लास्टिक, कपडे अशा कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. इतकेच नाही, तर मुलं कचरा, चपला किंवा स्टीलच्या टोचतील अशा कोणत्याही वस्तू तोंडात घालायचे सोडत नाहीत. या वस्तू लहान आकाराच्या असतील, तर त्या थेट घशात जाऊन अडकण्याची किंवा पोटात जाण्याची भीती असते. दरम्यान समोर आलेल्या व्हिडीओमध्ये या चिमुकलीने पाय अडकवलाय, वर एवढी रडत आहे की पाहून तुम्हालाही दया येईल.

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
Young people are working hard to take responsibility of the house
‘मुलाच्या खांद्यावर जेव्हा घरची जबाबदारी असते…’ मासेमारी करणाऱ्या तरुणांचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलीचा पाय कढईच्या कानामध्ये अडकला आहे. दरम्यान तिच्या वडिलांनी अलगदपणे तो पाय कढईतून बाहेर काढला. सुदैवानं तिला काहीही दुखापत झाली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पैसा असो वा नसो; मनाची श्रीमंती हवी! ऊस बागायतदार शेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती पाहून डोळ्यांत येईल पाणी

लहान मुलांकडे लक्ष द्या

सध्या सकाळी कामावर ते रात्री घर, असं बहुतेक सर्वांचंच आयुष्य धावपळीचं झालं आहे. महिलादेखील घरकामे सांभाळून जॉबही करत असतात. मात्र, अशा या परिस्थितीत लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा घटना उघडकीस येत आहेत. मात्र, अशा घटना वारंवार होऊ नयेत आणि गंभीर परिस्थिती उदभवू नये यासाठी पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही या काळजी घ्यायला हवी.

Story img Loader