scorecardresearch

Video: भररस्त्यात कारच्या छतावर चढून तरुणीची स्टंटबाजी, त्यानंतर असं काही घडलं…पाहा व्हायरल व्हिडीओ

तुम्ही जर असं काही स्टंट करत असाल तर सावधान… या तरुणीसोबत काय घडलं पाहा व्हिडीओ

Car Stunt
कार Stunt पडला महागात (Photo-Epic Fail twitter)

सोशल मीडियावर स्टंटचे अनेक धोकादायक व्हिडीओ समोर येत असतात. लोक कधी बाईकवर, सायकलवर बसून तर कधी गाडीच्या वर चढून स्टंट करत असतात. नुकताच एक अतिशय धोकादायक स्टंट समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी गाडीच्या वर चढून स्टंट करताना दिसत आहे. पण हे स्टंट करणं तिला चांगलच महागात पडलं आहे.

स्टंट करणं पडलं महागात

आजकाल स्टंटबाजी हा अनेक तरुणांचा छंद बनला आहे. पण कधी कधी हे स्टंट करणे अतिरेक होते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगी कारच्या वर उभी आहे. मुलगी गाडीच्या छतावरून स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. मुलगी बॅक फ्लिप करते पण मुलीची पाठ फ्लिप फ्लॉप होते आणि मुलगी गाडीची मागील काच फोडून आत पडते. या स्टंटमध्ये खूप धोका होता हे उघड आहे. व्हिडीओ पाहून मुलीला दुखापत झाली असावी, असे वाटते.

(हे ही वाचा : डॉक्टरचा झाला गर्लफ्रेंडशी वाद, अन् रागाच्या भरात पेटवली ७० लाखाची ‘ही’ लक्झरी कार)

पाहा व्हिडीओ

व्हिडीओ पाहून यूजर्सनी लुटला आनंद

हा व्हिडीओ एका ट्विटर युजरने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ जवळपास ७५ हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडीओला १४०० लाईक्स मिळाले आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यूजर्स खूप एन्जॉय करत आहेत. एका ट्विटर युजरने लिहिले की, पण मुलीला असे करून काय करायचे होते. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की त्याची काय गरज होती. व्हिडिओवर मीम्सद्वारे वापरकर्ते देखील चिमटी घेत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 13:22 IST