scorecardresearch

WWE चॅम्पियन द ग्रेट खली यांनाही पुष्पा चित्रपटातील डायलॉगची भुरळ; म्हणाले, “मै झुकेगा नहीं”

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील डॉयलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Khali
WWE चॅम्पियन द ग्रेट खली यांनाही पुष्पा चित्रपटातील डायलॉगची भुरळ; म्हणाले, "मै झुकेगा नहीं" (Photo- Khali Instagram)

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील डॉयलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट स्टार्स, क्रिकेटर्स यांच्यासह अनेक जण त्या शैलीतील डॉयलॉग सोशल मीडियावर शेअर करत आहेत. डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन द ग्रेट खलीही यात मागे नाहीत. खली सोशल मीडियावर ‘पुष्पा’च्या सर्वात प्रसिद्ध डायलॉगवर लिपसिंक करताना दिसत आहे. द ग्रेट खलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये द ग्रेट खली यांच्यासमोर एक टेबल आहे आणि तो खुर्चीवर डोकं खाली करून बसला आहे. यानंतर अल्लू अर्जुनचा प्रसिद्ध् डायलॉग ‘पुष्पा…पुष्पा राज. मैं झुकेगा नहीं…’ म्हणतात दिसत आहे. व्हिडीओमध्ये द ग्रेट खलीचे एक्सप्रेशन्सही अप्रतिम आहेत. अल्लू अर्जुनच्या शैलीशी जुळवून घेण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला आहे.

खलीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यासोबतच सोशल मीडिया यूजर्स खलीच्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘सर आपको कौन झुका सकता है.’ तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, ‘तुम्हाला झुकवणार अजून जन्माला कुठे आला आहे.’ ‘पुष्पा’ चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. सुकुमार यांनी याच चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम, हिंदी भाषांमध्ये हा चित्रप प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The great khali pushpa movie dialogue viral on social media rmt

ताज्या बातम्या