अनेक आठवडे सुरू असलेल्या तर्क-वितर्कांनंतर अखेर टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी प्रतिष्ठित करार केला. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि त्यांच्या मंडळाने सुरुवातीला मस्कच्या ताब्यात घेण्याच्या बोलीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. शेवटी, विचारविनिमय केल्यानंतर, मस्क यांच्या बाजूने निर्णय घेण्यात आला. या घोषणेनंतर लगेचच #LeavingTwitter हा हॅशटॅग ट्विटरवर नंबर एकवर ट्रेंड करू लागला. लोकांनी मायक्रोब्लॉगिंग साइटवर जाऊन घोषणा केली की ते ट्विटर सोडत आहेत कारण ते या टेकओव्हरवर खूश नव्हते. इतरांनीही सोशल मीडियावर अनेक जोक्स आणि मीम्सचा आनंद लुटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंटरनेट सध्या इलॉन मस्कच्या ट्विटर टेकओव्हरचे समर्थन करणार्‍या लोकांमध्ये आणि या घटनेला विरोध करणाऱ्या लोकांमध्ये विभागले गेले आहे. विरोध करणाऱ्या गटाला असे वाटते की हे पाऊल हानिकारक आहे.

WhatsApp व्हॉइस कॉलवर आता करता येणार ३२ लोकांना एकाच वेळी कनेक्ट; जाणून घ्या प्रक्रिया

“#leavingtwitter ट्रेंडिंग का आहे? मी असे ऐकले की रद्द संस्कृती आणि सेन्सॉरशिपचे सैनिक घाबरत आहेत. कोणतेही भाषण द्वेषयुक्त भाषण नसते. खऱ्या लोकशाहीच्या अस्तित्वासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही नितांत गरज आहे. इलॉन मस्कची स्मार्ट मूव्ह,” एका वापरकर्त्याने लिहिले.

एकदा हा करार पूर्ण झाला की ट्विटर सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपनी म्हणून अस्तित्वात राहणार नसून त्याऐवजी, ती पूर्णपणे इलॉन मस्कच्या मालकीची खाजगी कंपनी बनेल. २०२२ च्या अखेरपर्यंत हा करार पूर्ण होईल. ट्विटर कोणत्या मार्गावर जाईल हे फक्त वेळच सांगेल. परंतु जोवर इलॉन मस्क यांच्या योजनेचा संबंध आहे, मस्क यांना एक अशी जागा निर्माण करायची आहे जिथे प्रत्येकजण कोणत्याही सेन्सॉरशिपचा धोका न घेता किंवा ब्लॉक न होता चर्चा करू शकेल किंवा आपल्याला जे मांडायचं आहे ते मांडू शकेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The hashtag leavingtwitter became a trend after elon musk became the owner of twitter social media flooded with memes pvp
First published on: 26-04-2022 at 19:26 IST