देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश सध्या कडाक्याच्या उन्हाने हैराण झाला आहे. यावेळी उन्हाळ्याने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. उत्तर भारतात कडाक्याच्या उन्हाने हाहाकार माजवला आहे. गरमीसोबतच नागरिकांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे लोक दुपारच्या वेळेत घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत कमाल पारा ४४ अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचला आहे.

त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीच्या भीषण उन्हात एक व्यक्ती सूर्याच्या उष्णतेच्या मदतीने अंड्याचे ऑम्लेट बनवताना दिसत आहे. दिल्लीच्या कडाक्याच्या उन्हात एक माणूस आपल्या घराच्या गच्चीवर सूर्याच्या उष्णतेच्या मदतीने पॅनमध्ये ऑम्लेट बनवत आहे. त्या व्यक्तीने गॅसवर नाही तर उन्हात ऑम्लेट बनवले हे पाहून इंटरनेट यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

तुम्ही पाहू शकता की सूर्याची उष्णता इतकी कडक आहे की ती आगीप्रमाणे काम करत आहे. सर्वात आधी, तुम्हाला एक व्यक्ती छतावर पॅन घेऊन उभी असलेली दिसेल. त्यानंतर तो त्यात तेल ओततो. तेल घातल्यावर तो पॅनमध्ये अंड फोडतो. आपण पाहू शकतो की उष्णतेमुळे, गरम केलेल्या पॅनमध्ये अंड सहज शिजण्यास सुरवात होते. हा व्हिडीओ लोकांना थक्क करायला पुरेसा आहे. उन्हात ऑम्लेट बनवताना तुम्ही क्वचितच कोणाला पाहिले असेल.

हा व्हिडीओ cadel_tales नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इतका रंजक आहे की प्रत्येकजण तो पुन्हा पुन्हा पाहत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला पाच लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत आहेत.