Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कुठेही रील बनवू लागतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी डोंगरावर एका घोड्याच्या बाजूला उभी पाहून डान्स करत आहे, मात्र यावेळी घोडा तापला अन् त्यानं काय केलं तुम्हीच पाहा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही.अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर हसू आवरणे कठीण होऊन जाते. कधी भांडणाचे, कधी स्टंटचे, तर कधी जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचे हसून हसून पोट दुखून आले आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी माळरानावर जिथे घोडे चारा खात आहेत तिथेच त्या घोड्यांच्या बाजूला उभी राहून डान्स करत आहे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी या गाण्यावर तरुणी नाचताना अचानक गाण्याच्या आवाजाने घोडा बिथरतो आणि थेट तरुणीला लाथ मारतो. यावेळी तरुणीला नाचणं चांगलंच अंगलट आलं असून तरुणी तिथून पळून गेल्याचं दिसत आहे. अलीकडे प्रत्येकजण सोशल मीडियावर काही ना काही रील बनवत असतो. अनेकांना तर याचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे. तुम्हाला प्रत्येक दुसरा व्यक्ती सापडेल जो रील बनवतो आणि सोशल मीडियावर पोस्ट करतो. असे नाही की रील बनवणे चुकीचे आहे, परंतु काही लोक त्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ avipsaakhnal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलंय, “एक नंबर तुटली कंबर..” तर आणखी एकानं काय गरज आहे का अशी प्रतिक्रिया दिली आहे.