उत्तर प्रदेशच्या अलीगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या मध्यभागी एक व्यक्ती सासूच्या पायावर पडला. तो हात जोडून रडू लागला. त्याची एकच मागणी होती. पत्नीला परत घरी पाठवा. पण सासूचा मन मात्र थेट नकार दिला, आणि ती तिच्या निर्णायवर ठाम राहिली. आजूबाजूला लोक उभे होते. सगळे हे दृश्य पाहत होते. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण?
ही घटना अलीगढ पोलिस लाईन परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. मथुरेतील रहिवासी संजय नावाचा युवक आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी सासूकडे साकडे घालायला गेला होता. तेव्हा सार्वजनिक ठिकाणीच तो भावूक होत रडू लागला. सासूच्या पायावर पडत त्याने पत्नीला परत सासरी पाठवण्याची त्याची विनंती सतत सुरू होती; पण सासूने त्याचा एकही शब्द ऐकला नाही.
पत्नीचे कथित प्रेमसंबंध, घरातला वाद आणि पोलिसांपर्यंत पोहोचलेलं प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, संजय आणि त्याची पत्नी यांच्यातील वाद बराच काळापासून सुरू आहे. संजयचा आरोप आहे की पत्नीच अन्य एका व्यक्तीबरोबर कथित अवैध संबंध आहेत आणि त्यातूनच घरात दुरावा वाढला. प्रकरण आता महिला परामर्श केंद्रात चालू आहे, जिथे दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संजयने सासरकडच्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या मते, त्याला जीवाने मारण्याची धमकी दिली जात आहे. तसेच तो पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप नाकारतो. “मी तिची काळजी घेतो, उपचाराचा खर्चही केला… तरी माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत,” असे संजयचे म्हणणे आहे.
पोलिस तपासात गुंतागुंत
हे संपूर्ण प्रकरण आता पोलिसांच्या हातात गेले असून, दोन्ही बाजूंची चौकशी सुरू आहे. त्यात कौटुंबिक वाद, वैयक्तिक संबंध, आरोप-प्रत्यारोप या सर्वांचा तपास केला जाणार आहे.
सोशल मीडियावर चर्चा: सहानुभूती की शंका?
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना पतीची असहायता आणि भावनिक तडफड दिसते, तर काही जण हे ‘नाटक’ असल्याचं म्हणत आहेत. तर अनेकांचा प्रश्न असा — सत्य काय आहे? पत्नी खरंच त्रस्त आहे की पती फक्त भावनिक दडपण टाकतोय?
आता सर्वांचे डोळे पोलिस तपासाकडे
सध्या सत्य समोर येण्यासाठी पोलिस तपासाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. भावनिक नाट्यात लपलेला कौटुंबिक संघर्षाचे सत्य काय आहे हे पोलिसांच्या तपासातून उघड होईल.मात्र, या घटनेने एक गोष्ट निश्चित दाखवून दिली आहे. वैवाहिक तणाव किती टोकाला पोहोचू शकतो आणि एका घरातील वाद किती मोठ्या सार्वजनिक प्रसंगात बदलू शकतो.
