scorecardresearch

अनोखी मैत्री! इवल्याश्या मैनेची लहान मुलीसोबत जमली गट्टी, एकत्र राहण्याचा केला हट्ट, पाहा VIRAL VIDEO

केवळ माणूसच चांगला मित्र किंवा समोरच्यावर प्रेम करू शकतो, असा आपला समज असतो. मात्र, आपल्या आसपास राहणारे प्राणी अनेकदा आपला हा गैरसमज दूर करतात. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Girl-Friendship-With-Bird
(Photo: Twitter/ ShyamMeeraSingh )

केवळ माणूसच चांगला मित्र किंवा समोरच्यावर प्रेम करू शकतो, असा आपला समज असतो. मात्र, आपल्या आसपास राहणारे प्राणी अनेकदा आपला हा गैरसमज दूर करतात. अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडीओ समोर येत असतात ज्या प्राण्यांची हल्ले आणि त्यांच्यातली लढाई पहायला मिळते. पण ते मैत्री सुद्धा छान निभवतात. दोन प्राणी किंवा दोन व्यक्तींची मैत्री तुम्ही पाहिली असेल. पण प्राणी आणि माणसातली मैत्री तुम्ही कधी पाहिलीय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. या व्हिडीओमध्ये इवल्याश्या मैनेने चक्क लहान मुलीसोबत मैत्री केलीय. इतकी घट्ट मैत्री की ती मैना या मुलीला सोडायला तयारच नव्हती. तुम्हाला यावर विश्वास नसेल होत कदाचित पण हे खरंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मैना एका लहान मुलीला चिकटलेली दिसत आहे. लहान मुलगी वारंवार या मैनेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते, पण मैना तस तसं तिच्या जवळ जाते. दोघांची मैत्री पाहून लोकांना धक्काच बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : खोलीत महाकाय अजगराशी खेळत होती चिमुरडी, VIRAL VIDEO पाहून सारेच जण हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : “भाऊ, मला पाच किलो पीठ दे…” असं रडत रडत म्हणाला आणि एका रात्रीत नशीब पालटलं, पाहा हा VIRAL VIDEO

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्स आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक या मैनेच्या मैत्रीचं कौतुक करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : जैसे कर्म तैसे फळ..! गाडी वेगाने पळवण्यासाठी म्हशीला चाबकाने मारत होता आणि…पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ @ShyamMeeraSingh नावाच्या ट्विटर युजर हँडलने शेअर केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर अनेकांच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The little bird became friends with the little girl insisted on being together watch the viral video prp