scorecardresearch

Video: ‘या’ चिमुकलीने सर्वांसमोर असा काही प्रश्न विचारला की, खुद्द दलाई लामांना हसू आवरणं झालं कठीण

सोशल मीडियावर दलाई लामा यांचा एका लहान मुलीसोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

Video: ‘या’ चिमुकलीने सर्वांसमोर असा काही प्रश्न विचारला की, खुद्द दलाई लामांना हसू आवरणं झालं कठीण
या चिमुकलीचा प्रश्न ऐकल्यानंतर दलाई लामा यांनी अतिशय सुंदर असं उत्तर दिलं आहे. (Photo : Twitter)

तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा हे मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत होते. बिहार पोलिसांनी एका चिनी गुप्तहेर महिलेला अटक केली होती. ती महिला तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांची हेरगिरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला अटक केली होती. त्यामुळे दलाई लामा खूप चर्चेत आले होते.

अशातच आता पुन्हा एकदा दलाई लामा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी कारण वेगळं आहे. सोशल मीडियावर दलाई लामा यांचा एका लहान मुलीसोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलगी हातात माईक घेऊन धर्मगुरू दलाई लामा यांना काही प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा- “आम्हा दोघांमध्ये तेव्हा दुसरं कुणीच…,” रतन टाटा यांनी खास व्यक्तीसह शेअर केला फोटो

या चिमुकलीचा प्रश्न ऐकल्यानंतर दलाई लामा यांनी अतिशय सुंदर असं उत्तर दिलं आहे. त्यांची उत्तर देण्याची पद्धत आणि मुलीचा प्रश्न दोन्हीही नेटकऱ्यांना आवडलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही मुलगी दलाई लामा यांना विचारते तुला राग येत नाही का? यावर दलाई लामा म्हणतात की, ‘जेव्हा मी खूप गाढ झोपेत असतो आणि एक मच्छर आवाज करत येतो… आणि..’; असं म्हणत ते हाताची हालचाल करताना व्हिडीओत दिसत आहेत.

हेही पाहा- हजारो फूटांवरुन विमान उडत असतानाच दरवाचा उघडला अन…, व्हायरल Video पाहून अंगावर येईल शहारा

दलाई लामांचे उत्तर आणि मुलीचा प्रश्न ऐकून तिथे उपस्थित सर्व लोक हसायला लागतात आणि दलाई लामांनादेखील आपलं हसू आवरता आलं नसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ @yd_tweets नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्यांने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘”तुम्हाला राग येतो का?”, एक लहान मुलगी दलाई लामांना विचारते.’ या व्हिडिओ आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर या अनेकांनी लाईक केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 21:10 IST

संबंधित बातम्या