नुकताच प्रजासत्ताक दिन पार पडला. देशभरातला उत्साहात हा दिवस साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिना निमित्त शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयासह अनके ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात आले होते. अशाच कार्यक्रमांमध्ये आपल्या कौशल्याची झलक दाखवणार्‍या चिमुकल्याचं व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणी भाषण करताना दिसत आहे, कोणी डान्स करताना दिसत आहे तर कोणी गाणे गाताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चिमुकलीचा गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चिमुकलीने सुंदर गायन सादर केले आहे.

चिमुकलीचा गायनाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये पाहू शकता की,”अडीच वर्षाच्या ‘या’ चिमुकलीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुरेख गीत गायले आहे. चिमुकलीने मेरे ख्वाबो मे जो आए हे गाणे गायले आहे. चिमुकलीचा आवाज अतिशय गोड आहे. आपल्या सुंदर आवाजात ती निरागसपणे गाणे गात आहे. विशेष म्हणजे एवढ्या लहान वयात तिला संपूर्ण गाणे लक्षात आहे. चिमुकलीचे गायन नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर _aaple_pune नावाच्या पेजवर शेअर केली आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” ही २.५ वर्षाच्या मायराचा पहिला परफॉर्मन्स आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. काही लोक व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करत आहे. तर काही लोक चिमुकलीच्या गायनाचे कौतुक करत आहे. हा चिमुकलीचा आवाज नाही असे नेटकरी म्हणत आहेत.

काय आहे Videoचे सत्य

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीचे नाव मायरा आहे. तिच्या अधिकृत इंस्टाग्राम mayra_saifi_381वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे.

Viral Videoचे काय आहे सत्य

व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये खुलासा केला आहे की, या व्हिडीओमध्ये मायराने लिपसिंक केले आहे तिने गाणे गायलेले नाही पण तिला गाणे गाता येते, पुढच्यावेळी मायराच्या आवाजातील व्हिडिओ पोस्ट करू.

हा आवाज नक्की कोणाचा?

सारेगमप लिटिल चॅम्पस मधील स्पर्धक आरोही सोनी (aarohisoniofficial) हिने हे गाणे गायले होते. या गाण्यावर मायराने ओठ हलवून गाणे गात असल्याचे नाटक केले आहे.