आजकाल सोशल मीडियावर पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाशी संबंधित अनेक घटना व्हायरल होत असतात. यामध्ये कधी पतीने पत्नीला धोका दिल्याचं तर कधी पत्नीने पतीला फसवल्याचं पाहायला मिळतं. सध्या बिहारमधील नालंदामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथील लग्न झालेल्या पुरुषाने एका महिलेशी दुसऱ्यांदा लग्न केले म्हणून त्याच्या पहिल्या बायकोने त्याला चांगलाच धडा शिकवला आहे. शिवाय तिने सर्वांसमोर त्याला चप्पलेने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील पुरुषाच्या पहिली बायको नवऱ्याने दुसरे लग्न केल्याचं समजताच ती संतापली आणि तिने नवऱ्याला पोलीस स्टेशनसमोर चप्पलने मारहाण करायला सुरुवात केली. शिवाय दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर नवरा तीन मुलांचा आणि मला खर्चाचे पैसे देत नसल्याचा आरोपही तिने केला आहे. तर नवऱ्याने पहिल्या बायकोचं कोणाशी तरी अफेअर असल्याचा आरोप केला आहे.
हे प्रकरण बिंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील असून घटनेतील महिलेने सांगितलं की, तिच्या नवऱ्याने १० दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले आहे. शिवाय तो मला खर्चाला पैसेही देत नाही. तर जबाबात आरोपीने सांगितले, “त्याच्या पत्नीचे कोणाशी तरी अफेअर आहे आणि ती ६ महिन्यांपूर्वीच घर सोडून गेली होती. तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती घरी परतली नाही.”
तक्रार केली दाखल –
हे नवरा-बायको भररस्त्यातच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला लागले, या दरम्यान संतापलेल्या महिलेने पतीला चप्पलेने बेदम मारहाण करायला सुरुवात केली. या दोघांचं भांडण पाहून रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी जमली होती. भांडणानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले त्यानंतर पोलिसांनी तक्रारीची नोंद करुन घेतली आहे. पण सर्वांसमोर आणि थेट पोलीस स्टेशनसमोर बायकोने नवऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे.