scorecardresearch

पुस्तक देण्याच्या बहाण्याने गेली ती परतलीच नाही, माहेरी आलेली तरुणी प्रियकरासोबत पळाली

नवविवाहित तरुणी आपल्या मैत्रीणीला पुस्तक द्यायला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली

पुस्तक देण्याच्या बहाण्याने गेली ती परतलीच नाही, माहेरी आलेली तरुणी प्रियकरासोबत पळाली
मैत्रीणीला पुस्तक द्यायला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली ती पुन्हा माघारी आलीच नाही. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सध्या सोशल मीडियावर अनेक अशा बातम्या व्हायरल होत आहेत की ज्यामध्ये लग्नानंतरही मुलं मुली आपल्या जुन्या प्रियकरासोबत पळून जात आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या घटनेत एक नवविवाहित तरुणी लग्नाच्या सहा महिन्यानंतर आपल्या जुन्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुझफ्फरपूरमधील असून येथील एक १८ वर्षीय नवविवाहित तरुणी तिच्या जुन्या २२ वर्षीय प्रियकरासोबत पळून गेली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सकरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नवविवाहित तरुणी आपल्या मैत्रीणीला पुस्तक द्यायला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडली ती पुन्हा माघारी आलीच नाही. काहीवेळ या तरुणीचा शोध घेतला असता ती तिच्या जुन्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं उघडं होताच परिसरात एकच खळबळ उडाली तर तिच्या नवऱ्याला या घटनेमुळे धक्का बसला आहे.

हेही वाचा- घोर कलियुग! मुलीचं लग्न १० दिवसांवर येऊन ठेपलं अन् आई प्रियकरासोबत पळाली, जाताना मुलीचे दागिनेही घेऊन गेली

या घटनेनंतर मुलीच्या नातेवाइकांनी परिसरातील तरुणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्या मुलाने आपल्या मुलीला पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीचं आरोपी तरुणाने अपहरण केलं आहे. शिवाय यापूर्वीही या तरुणाने माझ्या मुलीचें कॉलेजमधून अपहरण केलं होतं. त्या घटनेनंतर मोठा वाद झाला होता. शिवाय त्यावेळी दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी मिळून हा वाद मिटवला होता.

हेही वाचा- ऐकावं ते नवलच! पोलिसांनी मारला पोलिसांच्या गाडीवर डल्ला; डिझेलचा मोह अंगलट आला…

दरम्यान, आम्ही आमची मुलगी वैशाली हिचे जिल्ह्यातील एका मुलाशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर ६ महिन्यानी ती माहेरी आली असता पुस्तके देण्याचे बहाण्याने घरातून बाहेर गेली ती परतली नाही. आम्ही वैशालीचा खूप शोध घेतला पण ती कुठेच सापडली नाही, तिचा फोनही बंद येत आहे. आम्ही अधिकची चौकशी केली असता समजलं की, त्या तरुणानेच आमच्या मुलीला पळवलं आहे. तो याआधीही तिच्या सासरच्या घरी जाऊन तिला फोन करून तिला त्रास द्यायचा असं मुलीच्या आईने सांगितलं.

हेही वाचा- माथेफिरु प्रेमीने विवाहितेच्या घरी पाठवली रुग्णवाहिका; पोलिसांनाही गंडवलं; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीला अटक करावी अशी मागणी मुलीची आईने केली आहे. कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीचं तरुणाने अपहरण केलं असल्याचं सांगितलं असलं तरी, फरार तरुण आणि तरुणीचे पूर्वीपासून प्रेमसंबंध होते असं स्थानिकांचे म्हणणे आहे. शिवाय मुलगी तिच्या लग्नामुळे खूश नव्हती म्हणूनच ती तिच्या जुन्या प्रियकरासह पळून गेली असल्याचंही स्थानिक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 19:51 IST

संबंधित बातम्या