पत्नी -पत्नीचं नातं असे आहे ज्यामध्ये प्रेम, आदर आणि विश्वास खूप महत्वाचा असतो. कधी नात्यात रुसवा-फुगवा असतो तर कधी खळखळून हसवणारे क्षण देखील असतात. अशा नात्यातील चढ उतार पार केल्यानंतर पती-पत्नीच्या नात्यातील खरा आनंद अनुभवता येतो. अनेकदा पती-पत्नीच्या नात्यावर मजेशीर विनोद केले जातात जे सर्वांना खळखळून हसायला भाग पाडतात. सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा सर्वत्र होत आहे. या व्हिडिओमध्ये एका लग्नसोहळ्यात भटजींनी पत्नीबरोबर कसे वागावे याचा सल्ला पतीला दिला आहे. व्हिडिओमध्ये भटजींनी Wife या शब्दाचा अर्थ अतिशय अनोख्या आणि मजेदार पद्धतीने सांगत आहेत. भटजींनी सांगितलेला कानमंत्र ऐकून नवरा -नवरीला देखील हसू आवरले आहे.

लग्न सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी लग्नसोहळ्यात भावूक करणारे क्षण असतात तर कधी मजेशीर क्षण असतात. सध्या सोशल मीडियावर होत असलेला व्हिडीओ देखील असाच मजेशीर आहे जो पाहून नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील हसू आले आहे. व्हिडिओमध्ये पंडित जी नववधूला गंमतीने सांगतात, “जर पती लग्नाच्या वेळी दिलेली सात वचने पूर्ण करू शकला नाही, तर मी पत्नी म्हणून नव्हे तर ‘WIFE’ म्हणून आयुष्य जगू लागेन. WIFE म्हणजे Without Information Fire Every time ( याचा अर्थ कोणतीही पूर्वसूचना न देता सतत रागवते ती)”

हेही वाचा – कॅनडामध्ये टीम हॉर्टन्स येथे नोकरीसाठी भारतीय विद्यार्थींची लागली मोठी रांग, पाहा Video Viral

भटजींनी सांगितलेला हा WIFE या शब्दाचा अर्थ ऐकून नवरा-नवरीला देखील हसू आवरत नाही आणि उपस्थित सर्वजण जोरजोरात हसू लागतात. आता हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भटजीच्या या आगळ्यावेगळ्या व्याख्येने सर्वांना खळखळून हसायला भाग पाडले आहे.

येथे व्हिडिओ पहा

हेही वाचा – अविश्वसनीय! ब्रह्मपुत्रानदीमध्ये उतरला हत्तींचा कळप, खोल पाण्यात पोहणाऱ्या हत्तींचे दुर्मिळ दृश्य, पाहा Viral Video

मोटस स्टुडिओ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत ५६ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “भटजी अगदी योग्य तेच बोलत आहेत.. आता मला समजले आहे की ‘WIFE’ चा खरा अर्थ काय आहे.” दुसऱ्याने म्हटले, ‘माझ्या पत्नीने हे पाहिले आणि आता म्हणते आहे की, भटजींनी सर्वकाही बरोबर सांगितले आहे. आता काळजी घ्यावी लागेल. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून हजारो लोकांनी तो शेअर केला आहे.