पंतप्रधान नरेंद्र मोदी याच आठवड्यामध्ये तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या प्रसिद्ध वृत्तपत्राने पंतप्रधान मोदींचं कौतुक करणारा लेख छापला आहे, असा दावा करणारा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा लेख द न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर-इन-चीफ जोसेफ होप यांनी लिहिल्याचं या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे या व्हायरल फोटोत या वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर मोदींचा मोठा फूल पेज फोटो छापण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. द न्यूयॉर्क टाईम्सचा हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केल जात आहे. या लेखाचं शिर्षक “मोदी हे पृथ्वीवरील शेवटची आशा आहेत,” असं आहे. मात्र आता या व्हायरल फोटोबद्दल ‘द न्यूयॉर्क टाईम्स’नेच खुलासा केलाय.

is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
Moscow concert hall attack suspects confess
मॉस्को हल्ल्याप्रकरणी चौघांचा कबुलीजबाब

“हा फोटो छेडछाड करुन तयार करण्यात आलाय. पंतप्रदान मोदींच्या अनेक व्हायरल होणाऱ्या फोटोंपैकी हा एक आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदींबद्दलचं आमचं वृत्तांकन वाचायचं असेल तर येथे क्लिक करा,” असं म्हणत ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने मोदीं विषयीच्या लेखांची एक लिंक शेअर केलीय. या ट्विटमध्ये त्यांनी मोदींच्या त्या व्हायरल फोटोवर लाल रंगाची रेष ओढून हा फोटो खोटा असल्याचं म्हटलंय. “ज्या काळामध्ये खऱ्या माहितीची सर्वाधिक गरज आहे त्या काळात अशाप्रकारचे फोटोशॉप केलेले फोटो ऑनलाइन शेअर करुन केवळ चुकीच्या माहितीमध्ये भर पडते आणि अनिश्चितता वाढते,” असंही या वृत्तपत्राने म्हटलंय. एका प्रकारे या माध्यमातून या नामांकित वृत्तपत्राने खोटा फोटो व्हायरल करणाऱ्या मोदी समर्थकांवर निशाणा साधलाय.

आधीच झालीय पोलखोल
हा फोटो खोटा असल्याचं अनेक वेबसाईटने केलेल्या फॅक्टचेकमध्ये समोर आलं आहे. हा लेख जोसेफ होप यांनी लिहिल्याचा दावा केला जात असतानाच ‘द न्यूयॉर्क टाईम्स’च्या कर्मचाऱ्यांची माहिती असलेल्या सेक्शनमध्ये जोसेफ होप नावाची कोणतीही व्यक्ती नसल्याचं दिसून आलंय. सोशल मीडियावर जोसेफ होप एडिटर-इन-चीफ असल्याचा दावा करण्यात आलाय मात्र अशी कोणतीही व्यक्ती या वृत्तपत्रासाठी काम करत नाही. जोसेफ होप हे नाव शोधल्यानंतर एका प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तीची माहिती मिळते. मात्र हे जोसेफ होप हे एशियन टाईम्समध्ये इंडिपेंडंट रिसर्चर म्हणून काम करतात. त्यांचा या लेखाशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. इंडिया टूडेने न्यूयॉर्क टाईम्सच्या वाईस प्रेसिडंट (कम्युनिकेशन) डेनियल रोडेस यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मेलवर त्यांनी सोशल मीडियावरील दावे फेटाळून लावले आहेत. तसेच “आम्ही असा कोणताच लेख छापला नसून जोसेफ होप नावाचा कोणताच कर्मचारी आमच्याकडे नाही तसेच न्यूयॉर्क टाईम्सचे एडिटर डीन बकेट असून त्यांनी असा लेख लिहिलेला नाही,” असं स्पष्ट केलं आहे.