ओडिशातील कटक शहरात एका महिलेने तिची करोडोंची संपत्ती रिक्षाचालकाला दान केली. हे थोडं विचित्र वाटेल पण ते खरं आहे. ६३ वर्षीय मिनाती पटनायक (Minati Patnaik) यांनी कटक शहरातील सुताहत भागात त्यांची तीन मजली इमारत एका रिक्षावाल्याला दान केली. वृद्ध महिलेने आपले सोन्याचे दागिने आणि इतर मालमत्ताही. बुद्धा समल (Budha Samal)कटक शहरातील एक गरीब रिक्षाचालक आहे.

महिलेने कोर्टात कागदपत्रांवर स्वाक्षरी केली, ज्यावर लिहिले आहे की ती तिची सर्व संपत्ती स्वतःच्या इच्छेने रिक्षाचालकाला दान करत आहे. ही बातमी शहरात पसरताच लोकांनी महिलेच्या या कामाचे कौतुक केले.असे म्हटले जाते की सहा महिन्यांपूर्वी मिनाती यांनी कोरोनामुळे त्यांचे पती गमावले, त्यानंतर तिच्या मुलीनेही हृदयविकाराच्या झटक्याने हे जग सोडले.

Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
mahayuti searching non controversial new face for nashik lok sabha seat
महायुतीतर्फे नव्या चेहऱ्याचा शोध; नाशिकमध्ये वाद टाळण्याचा प्रयत्न; जागा कोणत्या पक्षाला जाणार हे अस्पष्टच
Do not participate in party campaign without consent confusion due Vanchits new Instructions
… तोपर्यंत मित्र पक्षाच्या प्रचारात सहभागी होऊ नका, वंचितच्या फतव्याने संभ्रम
repair work of creek bridge on uran panvel road completed
उरणच्या खाडीपूल दुरुस्तीचे काम पूर्ण; ‘हाइट गेट’ हटवण्याची प्रतीक्षा; चार गावांतील हजारो नागरिकांना दिलासा

( हे ही वाचा: १३ कोटी भरून मॉडेलने ‘या’ विशेष भागाचा उतरवला विमा! कारण जाणून वाटेल आश्चर्य )

का घेतला हा निर्णय?

मिनाती यांच्यासोबत झालेल्या अपघातानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यासोबतचे नाते संपवले. त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठीही त्याचे नातेवाईकही त्याच्याकडे आले नाहीत. आयुष्यातील अनेक दुर्घटनांनंतर मिनाती यांनी त्यांची सर्व संपत्ती रिक्षाचालकाला दान करण्याचा निर्णय घेतला.असे म्हणतात की बुद्धा समलने या महिलेला कठीण दिवसात खूप मदत केली. प्रत्येक कठीण प्रसंगात ते महिलेच्या पाठीशी उभे राहिले. बुद्धाचे कुटुंबही त्या महिलेची काळजी घेण्यात व्यस्त होते.

( हे ही वाचा: पद्मश्री विजेत्याकडून पंतप्रधानांना खास गिफ्ट; भेट पाहून मोदींच्या चेहऱ्यावर आलं हसू )

कुटुंबाने केली होती मदत

मिनातीने सांगितले की, जेव्हा त्यांची मुलगी कोमल शाळेत शिकत असे तेव्हा बुद्धाने तिला मदत केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, “बुद्धा आणि त्यांच्या कुटुंबाने आम्हाला खूप मदत केली.”

( हे ही वाचा: T20 WC: पाकिस्तानच्या चाहत्यांकडून धमक्यांच्या बातम्यांवर हसन अलीच्या पत्नीने केली सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाली… )

मिनाती यांच्या म्हणण्यानुसार, “माझ्या सर्व नातेवाईकांकडे मालमत्ता आहे. मला नेहमीच माझी मालमत्ता एका गरीब कुटुंबाला दान करायची होती. म्हणूनच मी ठरवले की मी माझी संपत्ती बुद्धांना दान करेन, जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर त्यांना कोणी त्रास देऊ नये.”