Premium

Video : कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाण्यासाठी मालकाचा हट्ट… पहारेकरी सोबत झालं जोरदार भांडण

सोशल मीडियावर एका व्हिडीओत मालक कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाण्याचा हट्ट करू लागतो आणि पहारेकरी आणि अज्ञात महिलेशी भांडू लागतो.

The owner had a heated argument with the stubborn guard to take the dog into the elevator
(सौजन्य:ट्विटर/ @GreaterNoidaW) Video : कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाण्यासाठी मालकाचा हट्ट… पहारेकरी सोबत झालं जोरदार भांडण

Viral Video : काहीजण प्राणीप्रेमी असतात, ते प्राण्यांना अगदी प्रेमाने सांभाळतात. त्यांना प्राण्यांच्या विरोधात घडणारी एकही गोष्ट सहन होत नाही. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने भिंतीवर कुत्र्याचं लावलेलं पोस्टर काढून टाकले म्हणून एका महिलेने तरुणाला मारले. हे प्रकरण ताजं असताना नोएडामध्ये आणखीन एक घटना घडली आहे. काहीजण प्राण्यांना बघून त्यांच्यापासून पळ काढतात. प्राण्यांना घाबरणाऱ्या अनेकांना प्राणी आपल्याला ईजा पोहचवतील याची भीती मनात असते. तर आज सोशल मीडियावर याचसंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये एक लहान मुलगा कुत्र्याला घाबरत असतो, पण अज्ञात मालक कुत्र्याला लिफ्टमध्ये घेऊन जाण्याचा हट्ट करू लागतो आणि पहारेकरी आणि अज्ञात महिलेशी भांडू लागतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण असे आहे की, बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये एक लहान मुलगा आधीपासून उभा असतो. तसेच एक तरुण स्वतःचा कुत्रा घेऊन येतो. लिफ्टमध्ये आधीपासून उपस्थित लहान मुलाला कुत्र्याची भीती वाटत असते म्हणून तो कुत्र्याच्या मालकाला कुत्रा आतमध्ये घेऊन येण्यापासून थांबवत असतो. पण, कुत्र्याचा मालक कुत्र्याला बांधून ठेवलं आहे असे सांगतो आणि त्याच लिफ्टने कुत्र्याला घेऊन जायचा हट्ट करत असतो. त्यामुळे पहारेकरी, एक अज्ञात महिला आणि कुत्र्याचा मालक या तिघांमध्ये वाद सुरू होतो.

तसेच एक अज्ञात महिला या प्रकरणाचा व्हिडीओ शूट करत असते आणि तरुणाला म्हणते, कुत्र्यापासून एखाद्याला भीती वाटत असेल तर तुम्ही थोडा वेळ बाहेरच थांबायला पाहिजे. पण, कुत्र्याला सोबत घेऊन येणारा तरुण सारखं एकच वाक्य बोलताना दिसत आहे की, मी कुत्र्याला बांधून ठेवलं आहे आणि तरीसुद्धा जर कोणाला कुत्र्याची भीती वाटत असेल तर त्याने लिफ्टमधून बाहेर यावे. मी का बाहेर थांबू ? अशा शब्दात कुत्र्याचा मालक एका अज्ञात महिलेसोबत भांडताना दिसत आहे.

हेही वाचा… Mathura Train Accident : मथुरा रेल्वे स्टेशनवर झाला अपघात! रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली ट्रेन, पाहा व्हिडीओ

पोस्ट नक्की बघा :

भांडणानंतर मालक कुत्र्याला दुसऱ्या लिफ्टमधून घेऊन जातो :

अज्ञात महिला तरुणाला त्याचा रूम नंबर विचारते, तेव्हा तरुण अगदीचं उद्धट उत्तर देतो आणि म्हणतो, आता चेहरा पाहिलात मग रूम नंबर ऐकून काय करणार ? असे म्हणतो. नंतर कुत्र्याचा मालक पहारेकरी सोबतसुद्धा भांडत असतो. बिल्डिंगमध्ये दोन लिफ्ट असतात, तर भांडणानंतर थोड्या वेळाने तरुण कुत्र्याला दुसऱ्या लिफ्टमध्ये घेऊन जातो.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्स (ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर @GreaterNoidaW या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नोएडाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ पाहून काहीजण कुत्र्याच्या मालकाची बाजू घेत आहेत, तर काहीजण लहान मुलाची बाजू घेत आहेत. अनेकजण हा विषय उगीचच ताणला जातोय असे म्हणताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The owner had a heated argument with the stubborn guard to take the dog into the elevator asp

First published on: 27-09-2023 at 17:46 IST
Next Story
VIDEO: आई मासे विकत होती; मुलगा ३ वर्षांनी अचानक आला समोर अन्…पाहताच धाय मोकलून रडू लागले माय-लेक