आई – वडीलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताचं मुलगा किंवा मुलगी कोणत्याही जन्मी करू शकत नाही. आई वडिल आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात, प्रसंगी स्वत: उपाशी राहतात मात्र मुलांना काही कमी पडू देत नाहीत. मुलांना चांगलं शिक्षण देऊन स्वप्न पाहतात. लेक ही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते, लहानपणापासून वडिल लेकीला अगदी फुलाप्रमाणे जपतात. मात्र हीच मुलगी जर मोठी झाल्यावर वडिलांच्या विरोधात जात असेल तर, कोणत्याही वडिलांवर दुख:चा डोंगर कोसळेल. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

वडिल आणि लेकीचं नातं हे खूप वेगळं असतं. एक मुलगी जेवढं आपल्या वडिलांवर प्रे करते तेवढं प्रेम कुणीही करु शकत नाही. मात्र समोर आलेल्या व्हिडीओमध्ये उलटं झालं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वडील आपल्या मुलीसमोर हात जोडून उभे आहेत आणि ती तिच्या प्रियकरासोबत उभी, वडील तिला घरी चलण्याची विनवणी करतात. मात्र मुलगी त्यांना ओळखत नसल्याचं सांगते. जेव्हा मुलगी ऐकत नाही तेव्हा हा बाप आपल्या मुलीच्या पाया पडतो. पण, त्या निष्ठुर मुलीच्या काळजाला पाझर फुटत नाही. लेकीसमोर हताश झालेल्या वडिलांना पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: शेतात असताना सरकारी नोकरीचा रिझल्ट लागला, एकमेकांना मिठी मारत धाय मोकलून रडू लागले बाप-लेक..

हे प्रकरण बनासकांठा जिल्ह्यातील रैया गावातील आहे. तरुणीने काही काळापूर्वी घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केले होते. तेव्हापासून युवती तिच्या प्रियकरासोबत राहत होती. याबाबत वडिलांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आणि ती सापडली. पोलिसांनी फरार मुलगी आणि तिच्या प्रियकराला पालकांसमोर हजर केले असता, मुलीने त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि पतीसोबत परत जाऊ लागली. आपल्या मुलीला जाताना पाहून वडिलांचे डोळे भरून आले.

Story img Loader