दिल्लीहून टोरंटोला जाणाऱ्या विमानातून प्रवास करणाऱ्या एका अज्ञात महिलेला बरं वाटत नव्हते. पण, एका व्हायरल सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे, बंगळुरूमधील एका डॉक्टरांच्या त्वरित मदतीमुळे हे संकट टळले. डॉक्टर सुंदर शंकरन यांनी एक्स (ट्विटर) अकाउंटवर ही घटना शेअर केली आहे. एअर इंडियाच्या विमानात डॉक्टर सुंदर शंकरन आणि आणखी एक डॉक्टर यांनी महिलेची कशाप्रकारे मदत केली हे त्यांनी पोस्टमधून सांगितले आहे.
दिल्लीहून टोरंटोला जाणाऱ्या विमानात डॉक्टर सुंदर शंकरन आणि रेडिओलॉजिस्ट सतीश प्रवास करत होते. तेव्हा विमानात एका महिलेला बरं वाटत नव्हते. विमान टेक ऑफ व्हायचे बाकी होते आणि सुदैवाने प्रकृती थोडी स्थिर असल्यामुळे महिलेला स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने विमानातून बाहेर घेऊन जाण्यात आले. तेव्हा एअर इंडियाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले आणि सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण विमानाची सुरक्षा तपासणी आणि उड्डाण एक तास उशिराने करण्यात आले.




हेही वाचा…अब्जाधीश बिल गेट्स गटारात उतरले आणि Video झाला व्हायरल; शेवटी समजले की….
पोस्ट नक्की बघा :
डॉक्टरांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, माझ्या वैद्यकीय कारकिर्दीत गेल्या ४५ वर्षांत मला विमानात अशा घटनेवेळी मदतीला जाण्याची ही तिसरी वेळ आहे. प्रथम दिल्ली ते बंगळुरू विमानात आयएएफ यांच्या एका अधिकाऱ्याच्या छातीत दुखू लागले तेव्हा त्यांच्या उपचारासाठी गेलो आणि त्या अधिकाऱ्याला ताबडतोब कमांड हॉस्पिटल एअरफोर्समध्ये नेण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच एअर इंडियाचे प्रमुख यांनी मला धन्यवाद देताना एक पत्र पाठवले, जे हृदयस्पर्शी होते. तरुण वयात डॉक्टरी पेशात नुकतीच आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या डॉक्टरसाठी हे पत्र अगदी खास होते; असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @sundar_s1955 यांच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या या पोस्टवर एअर इंडिया कंपनीने कमेंट केली आहे आणि लिहिले की, धन्यवाद! तुम्ही लोकांसाठी मदतीचा हात पुढे करायला कधीही मागे-पुढे बघत नाही. तसेच तुम्ही केलेल्या मदतीचा आम्ही सन्मान करतो, असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.