लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की मुलं हे देवाचं रूप असतात. लहान मुलं खूप निरागसही असतात. एखाद्या लहान मुलाने एखाद्याला मदत करायला सुरुवात केली तर तुम्हाला कसे वाटेल याची कल्पना करा. तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल. असाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?

हा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. या व्हिडीओमध्ये एक लहान मूल कुत्र्याची तहान शमवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्र्याची तहान शमवण्यासाठी मुल पूर्ण ताकदीने हापसा चालवत आहे.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका

( हे ही वाचा: सनी देओलने चाहत्यांना म्हटले गुड मॉर्निंग, मग मागे उभ्या असलेल्या गायीनेही दिले उत्तर, पहा मजेशीर video )

लोकांची मनं जिंकली

मुलाच्या मेहनतीच्या या व्हिडीओने सर्वांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबत त्याने एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कितीही लहान असो, प्रत्येकजण एखाद्याला शक्य तितकी मदत करू शकतो.’

( हे ही वाचा: पठ्ठ्याने जुनी भांडी आणि रिकाम्या बादल्यांनी तयार केले संगीत; हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच )

( हे ही वाचा: रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीने केलं असं काही की, CCTV फुटेज पाहून नेटीझन्स झाले थक्क )

पूर्ण ताकदीने चालवला हापसा

तुम्ही बघू शकता की मूल इतके लहान आहे की त्याला हापसा चालवणे कठीण जात आहे. यानंतरही तो पूर्ण ताकदीने हापसा चालवण्याचा प्रयत्न करत कुत्र्याची तहान भागवत आहे. मुलगा उडी मारून हापसा हलवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर हापशातून बाहेर पडणारे पाणी कुत्रा पितानाही दिसत आहे.