रूग्णसेवा करत असतानाच सुरु होता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास; IAS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते परंतु आर्थिक दुर्बलता त्यांच्या अभ्यासाची आवड कमी करू शकली नाही.

dr nagaarjuna
ते रोज जॉब केल्यानंतर ६ ते ८ तास अभ्यास करत होते (फोटो:@arjun_gowda__ias/instagram)

डॉ नागार्जुन (अर्जुन) बी गौंड हे एक भारतीय आयएएस अधिकारी आहेत. ज्यांनी २०१८ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अखिल भारतीय ४१८ वा रँक (एआयआर) मिळवला होता.नागार्जुन आयएएस होण्यापूर्वी पूर्णवेळ रेजिडेंट डॉक्टर होते. पूर्ण वेळ काम करण्याव्यतिरिक्त, त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारीही केली. त्यांची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती, म्हणून त्यांची स्वयंअध्ययन निवडले आणि भारताच्या प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.

काम सांभाळून अभ्यास

ज्या वेळी डॉ अर्जुन यूपीएससीची तयारी करत होते, त्या वेळी ते कर्नाटकातील मंड्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये रेजिडेंट म्हणून काम करत होते. त्यांना सकाळी ९.30 ते दुपारी ४.30 पर्यंत रुग्णालयात राहावे लागत होते. तेव्हा ते आपलं काम करून त्यांच्या CSE च्या तयारीसाठी किमान सहा तास द्यायचे.

असा होता प्रवास

नागार्जुन गौंड यांचा जन्म कर्नाटकातील एका गावात झाला. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते परंतु आर्थिक दुर्बलता त्यांच्या अभ्यासाची आवड कमी करू शकली नाही. बारावीनंतर नागार्जुनयांनी MBBS ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्यांना एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली. नोकरीच्या काळातच त्यांनी सिव्हिल परीक्षेची तयारी करण्याचे मनाशी केले. पण घरची कमकुवत आर्थिक परिस्थिती असल्यामुळे त्यांनी नोकरी करत करतच परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला.

अभ्यासाचे असे केले नियोजन

यानंतर त्यांनी अभ्यासासाठी एक नियोजन केले, ते रोज जॉब केल्यानंतर ६ ते ८ तास अभ्यास करत होते. नोकरीच्या वेळी वेळ मिळाल्यावर त्यांनी अनेक वृत्तपत्रीय अॅप्सचे सदस्यत्व घेतले होते त्याच्यावर ते लेख वाचत असत. जेणेकरून ते स्वतःला अपडेट ठेवू शकतील. जेव्हा जेव्हा ते चाचणीचे प्रश्न सोडवण्याविषयी बोलतात तेव्हा तेव्हा ते उमेदवारांना ऑफलाइन चाचणी देण्याचं मार्गदर्शन करतात.

इयत्ता ६ वी ते १२ वी NCERT पुस्तक, आधुनिक इतिहास आणि प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास इयत्ता ११ तामिळनाडू NCERT पुस्तकातून त्यांनी इतिहास विषयाची तयारी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: The practice of competitive examination begins while serving the patient inspirational journey of an ias officer ttg