scorecardresearch

Video: कर्म तैसे फळ! चोरी करून पळताना घडली जन्माची अद्दल; समोरुन ट्रक आला अन्…

व्हिडीओमध्ये एक चोरटा रात्रीच्या वेळी महिलेला लुटण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे

Video: कर्म तैसे फळ! चोरी करून पळताना घडली जन्माची अद्दल; समोरुन ट्रक आला अन्…
व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला 'कर्म तैसे फळ' या वाक्याची आठवण होईल.(Photo : Twitter)

सोशल मीडियावर दररोज लोखो व्हिडिओ पोस्ट केले जातात. या व्हिडीओद्वारे आपलं मनोरजंन होतं, तर काही व्हिडीओ आपणाला काही धडा शिकवून जातात. सध्या अशाच एका चोराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्हाला ‘कर्म तैसे फळ’ या वाक्याची आठवण होईल.

आपण नेहमी असं म्हणत असतो की, प्रत्येकाला आपल्या चांगल्या वाईट कृत्याचं फळ मिळते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये वाईट कृत्याचे झटपट परिणाम दिसून आले आहेत. अशाच एका घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चोरटा महिलेला लुटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

हेही पाहा- तिकीट दाखवलं नाही म्हणून टीसींची प्रवाशाला लाथा बुक्यांनी मारहाण, धक्कादायक Video व्हायरल

ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक चोरटा रात्रीच्या वेळी एका महिलेला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. तर महिला या चोरट्यापासून स्वत:ला आणि जवळच्या किमती वस्तूंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, व्हिडीओमध्ये पुढं जे काही होतय ते पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण या चोरट्याला त्याच्या वाईट कर्माची शिक्षा ज्या प्रकारे मिळाली आहे. ते पाहून अनेक चोरटे चोरी करणंच सोडून देतील.

हेही पाहा- मेडिकलमध्ये ORS घ्यायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा Video व्हायरल

कारण हा चोरटा महिलेकडील सामान हिसकावून तेथून पळ काढायला जातो. तेवढ्यात एक व्हॅन तिथे थांबते, त्या व्यक्तीला खाली उतरताना पाहून हा चोर पळू लागतो, तेवढ्यात समोरून येणाऱ्या एका भरधाव वाहनाला तो धडकतो आणि जागेवर कोसळतो. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणत आहेत की, “आता लोकांची खात्री पटली आहे की, काही वेळा कर्मांची शिक्षा लगेच मिळते.” हा व्हिडिओ “इंस्टैंट कर्मा” नावाच्या ट्विटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये “ब्राझीलमध्ये कोणाला लुटायचं आहे!” असं लिहलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 15:03 IST

संबंधित बातम्या