Shocking video: देशात रस्ते अपघात सातत्याने होत आहेत. दिवसेंदिवस अशा अपघातांचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे रोज शेकडो जणांना आपला जीव गमावावा लागतोय. विशेषत: भारतात बाईक अपघातांचे प्रमाण अधिक आहे. यात हेल्मेट न घातल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेक तरुण मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे लोकांना वेळोवेळी हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला जातो, कारण आजवर अशा अनेक अपघातांचे व्हिडीओ पाहिले गेलेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या अपघातामध्ये हेल्मेट घालूनही तरुण वाचू शकला नाही. भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला अन् थेट तरुणाचं शरीर धडावेगळं करुन गेला. याचा काळीज पिळवटून टाकणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तु्म्हालाही धक्का बसेल.

तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरीदेखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये अशी घटना घडली आहे. या व्हिडीओवरुन कधी काय होईल याचा नेम नाही हे लक्षात येत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर फारशी वाहनांची वर्दळ दिसत नाहीये. फक्त एकच बाईक चालक सुरुवातीला दिसतो. यानंतर पत्र्यांनी भरलेला एक ट्रक भरधाव वेगात रस्त्यावर येतो आणि त्यातला एक पत्रा उडून थेट बाईक स्वारकडे जातो. यावेळी हा पत्रा इतक्या जोरात फेकला जातो की थेट बाईकवर असलेल्या व्यक्तीची मान धडावेगळी होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीनं हेल्मेटही घातलेलं आहे मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. अतिशय भयंकर असा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DI8bgQCp9LV/?utm_source=ig_web_copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ bhagat_singh.raj नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही व्हिडीओवर कमेंट करत आहेत, एकानं म्हंटलंय सगळी चूक ट्रक ड्रायव्हरची आहे त्याच्यावर कारवाई करा” दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिलीय “दुसऱ्याच्या चुकीमुळे जीव गेला”