Video Viral: या जगात भावा-बहिणीचं नातं इतर नात्यांच्या तुलनेत खूप खास असतं. हे दोघे क्षणात भांडतात आणि क्षणात एकत्रही येतात. घरात एकमेकांशी कितीही भांडले तरीही आपल्या भावंडांबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम, माया असते. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एका बहीण-भावाची जोडी रानात फिरत असून त्यावेळी अचानक भाऊ असं काही तर करतो, जे पाहून बहीण मोठमोठ्याने आक्रोश करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी मनोरंजन करणारे तर कधी आपल्या मनाला भावूक करणारे व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात चिमुकल्या बहिणाला तिच्या भावाबद्दल वाटणारं प्रेम पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स खूप कौतुक करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका बहीण-भावाची जोडी गावातील रानामध्ये फिरत असून यावेळी भाऊ अचानक बहिणीला रस्त्यात उभं करून स्वतः रानाच्या शेजारी असलेल्या तळ्यामध्ये उडी मारतो. भावाने तळ्यात मारलेली उडी पाहून बहीण मोठमोठ्याने आक्रोश करते. त्यानंतर ती तळ्याच्या बाजूला जाऊन उभी राहते आणि भावाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी विनंती करते. यावेळी ती “दादा तू बाहेर ये ना”, असं म्हणत मोठ्याने रडते. सध्या हा भावा-बहिणीचा संवेदनशील व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा: ‘भावा, कर्म तुला सोडणार नाही…’ तरुणांनी म्हशींबरोबर घेतला पंगा, पुढे जे घडलं… VIDEO पाहून व्हाल शॉक
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mahaz_e_ishq या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “हा व्हिडीओ पाहून मला रडू आलं.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “व्हिडीओ बनवण्यासाठी असं करायची काहीच गरज नव्हती.” तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “लहान बहिणीच्या मनात तिच्या भावाबद्दल किती प्रेम आहे.”