scorecardresearch

युक्रेनच्या युद्धभूमीवरच सैनिकाने प्रेयसीला केलं प्रपोज; हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

युक्रेनमधील एका सैनिकाने युद्धादरम्यान प्रेम व्यक्त करून आपले नाते अमर केले आहे.

Russia Ukraine war
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @kendisgibson / Twitter )

रशियाने युक्रेनवरचा संघर्षाला आठवड्यापेक्षाही जास्त वेळ होत आला आहे. युक्रेनियन लोकांच्या त्यांच्या देशाप्रती असलेल्या उत्कटतेला प्रत्येकजण सलाम करत आहे. अशा परिस्थितीत एक हृदयस्पर्शी कथा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

युद्धाच्या दरम्यान व्यक्त केले प्रेम

युक्रेनमधील एका सैनिकाने युद्धादरम्यान प्रेम व्यक्त करून आपले नाते अमर केले आहे. तोफ आणि गोळ्यांच्या आवाजात प्रपोज करणे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे वाटत असले तरी हे प्रत्यक्षात तसे घडले आहे. संपूर्ण कथा जाणून घेण्यापूर्वी, तुम्ही हा व्हिडीओ पाहा..

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

कसं केलं प्रपोज?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा सैनिक आणि त्याचे काही साथीदार कारच्या छतावर हात ठेवून कारभोवती उभे आहेत. यानंतर, सैनिकाची मैत्रीण त्या गाडीतून खाली उतरताच, सैनिक तिच्यासमोर गुडघे टेकतो आणि तिला अंगठी देऊन प्रपोज करतो.

हा प्रस्ताव स्वीकारून दोघांनीही एकमेकांना मिठी मारताच उपस्थित लोकांनी त्यांच्यासाठी आनंद व्यक्त केला आणि जोडप्याला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली.युक्रेनियन लोक हृदयावर राज्य करत आहेत.

(हे ही वाचा: Video: स्मृती मानधनाचा ‘हा’ SIX एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया Viral)

(हे ही वाचा: Video: श्रीवल्ली गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स viral; नेटीझन्स म्हणतात ‘सगळ्यात गोड पुष्पा हाच’)

युक्रेनचे नागरिक ज्या प्रकारे रशियन हल्ल्याचा सामना करत आहेत ते बघू अनेक देशातील नागरिक त्यांना सलाम करत आहेत. अशा परिस्थितीत आनंदी राहणे आणि शौर्य दाखवणे खरोखरच कौतुकास्पद आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The soldier proposed to his girlfriend on the battlefield of ukraine heartbreaking video goes viral ttg

ताज्या बातम्या