scorecardresearch

Premium

अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओत एका चिमुकल्याने अभ्यास न करण्यासाठी आईला अनोखं कारण सांगितलं आहे ; जे ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही

The son told his mother a strange reason for not studying
(सौजन्य:इन्स्टाग्राम/@itsmetarunshukla) अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

Viral Video : लहान मुलांचा अधिक रस हा खेळण्यामध्ये असतो. त्यांना अभ्यासाची फार आवड नसते. लहान मुले अभ्यास न करण्यासाठी कोणतं कारण सांगतील याचा काही नेम नसतो. अभ्यास करायला घेतल्यावर भूक लागते, पोटात दुखते, झोप येते अशी बरीच कारणं मुलांकडे तयार असतात. तर आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. एका चिमुकल्याने अभ्यास न करण्यासाठी अनोखं कारण सांगितलं आहे, जे आजवर तुम्ही ऐकलं नसेल.

एक चिमुकला टेबलावर बसला आहे. चिमुकल्याची आई त्याचा अभ्यास घेत आहे. चिमुकला अभ्यासाची वही समोर ठेवून त्यावर अंक लिहिताना दिसत आहे. तर अभ्यास करता करता मुलगा रडतानासुद्धा दिसत आहे. चिमुकला रडताना म्हणतो की, मला श्वास घ्यायला त्रास होत आहे. आई हे ऐकून, तुला खेळताना श्वास घ्यायला त्रास होत नाही, फक्त अभ्यास करतानाच होतो असे ओरडून म्हणते. त्यानंतर चिमुकला वडिलांना बोलवायला सांगतो आणि हाताला जखम झाली आहे हेसुद्धा दाखवतो. आपण पडल्यावरच वाढतो असे आई सांगते आणि चिमुकल्याचं हे कारणसुद्धा आई फेटाळून लावते व त्याला अभ्यास करण्यास सांगते. अभ्यास न करण्यासाठी चिमुकल्याची मजेशीर कारणं एकदा तुम्हीसुद्धा बघाच .

A special cup for drinking coffee in space
अंतराळात कॉफी पिण्यासाठी खास कप! महिला अंतराळवीराने दाखवली झलक… Video एकदा बघाच
Yoga For Weight Loss In Marathi
वजन कमी करण्यासाठी ‘या’ २ आसनांचा करा सराव; मानसिक ताणतणावही होईल दूर, वाचा तज्ज्ञांचा सल्ला…
7-day diet plan for weight loss
Quick weight loss: वजन कमी करण्यासाठी ‘सात’ दिवसांचा उच्च प्रथिनयुक्त आहार मदत करू शकतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Vishakha
“मोदकाच्या पाकळ्या करताना…”, विशाखा सुभेदार यांनी दिली मोदक उत्तम होण्यासाठी खास टीप, म्हणाल्या, “त्याचं सारण…”

हेही वाचा… Mumbai Police Video : मुंबई पोलिसांकडून बाप्पाला देण्यात आली अनोखी मानवंदना, सूरमयी सादरीकरणाचा व्हिडीओ एकदा पाहाच…

पोस्ट नक्की बघा :

अभ्यास न करण्याचे आईला सांगितले मजेशीर कारण :

आई-बाबा मुलांना नेहमीचं अभ्यासाचे महत्व पटवून देत असतात. लहान मुलांनी अभ्यास न करण्याची अनेक कारणं शोधली तरीही आईपासून त्यांची सुटका नसते. पण, त्यातच काही मुले खोडकर असतात आणि ते नवनवीन कारणं शोधून काढतात आणि आई-बाबांना भावुक करण्याचा प्रयत्न करतात . व्हिडीओतील मुलानेसुद्धा असंच काहीसं करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि आईकडून त्याला ओरडा पडला, जे पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

सोशल मीडियावर @itsmetarunshukla या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा मजेशीर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकजण व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. काहीजणांना चिमुकल्याची दया येत आहे, तर काहीजण ‘आईपासून मुलांचा आगाऊपणा लपून राहत नाही’ असे व्हिडीओखाली कमेंट करताना दिसून आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The son told his mother a strange reason for not studying asp

First published on: 27-09-2023 at 18:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×