Premium

पोलिसांच्या भीतीने ड्रायव्हरने अचानक वळवली भरधाव कार, थेट ट्रकवर कोसळली अन्…, भयंकर घटनेचा Video व्हायरल

हा व्हायरल व्हिडीओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

accident trending news
सध्या एका कारचा भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Photo : Twitter)

हॉलिवूडपासून बॉलीवूडपर्यंतच्या अनेक चित्रपटांमध्ये गाड्यांचे धक्कादायक स्टंट तुम्ही पाहिले असतील. या स्टंटमध्ये, धावत्या ट्रकखालून कार बाहेर काढणे किंवा पुलावरून कार उडवल्याचं तुम्ही पाहिलं असेल, पण सध्या एका कारचा भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील स्टंट कोणत्याही चित्रपटामधील नव्हे तर वास्तवात घडलेला आहे. या व्हिडीओत एक भरधाव कार पुलाच्या कॅरेजवेवरून बसच्या छतावर पडते आणि दुसऱ्या बाजूच्या कॅरेजवेवर चढून धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. अनेकांनी ही घटना अतिशय धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्ष गोयंका यांनी व्हिडिओ शेअर केला व्हिडीओ –

हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. गोयंका हे सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतात. शिवाय ते सतत नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या त्यांनी असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अंडरपासच्या कॅरेजवेमधून एक स्पोर्ट्स कार भरधाव वेगाने येताना दिसत आहे, परंतु कारचालक पोलिसांना पाहून या कारचालक घाबरतो आणि अचानक कार वळवतो. त्यामुळे कार रेलिंग तोडून थेट पुलाखालून जाणाऱ्या बसच्या छतावर पडते. यावेळी ड्रायव्हरकडून चुकून एक्सीलेटर दाबला गेल्यामुळे कार अंडरपासच्या दोन लेनमधील भिंतीवर आदळते आणि थेट दुसऱ्या बाजूला असलेल्या कॅरेजवेमध्ये जाऊन पडते. आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या भयानक पद्धतीने आदळूनदेखील कार सुरक्षित असल्याचं दिसत आहे. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- एकाचवेळी २ सायकल पळवणाऱ्या व्यक्तीचा Video व्हायरल, अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हेही पाहा- चक्क हवेत तरंगतोय दगड? व्हायरल फोटोमागील वास्तव समजल्यावर तुम्हीही व्हाल थक्क

नेटकरी म्हणाले ‘खतरों का खिलाडी’

गोयंका यांच्या ट्विटरवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, खतरों का खिलाडी है. तर दुसर्‍याने, आश्चर्यकारक, कार कोणत्या टायरवर चालत होती? मी CEAT चे नाव घेणार नाही. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, कृपया असे म्हणू नका की, तो CEATचा टायर वापरत होता. दरम्यान अनेकांनी तर हा व्हिडिओ खरा आहे का? असा प्रश्न विचारला आहे. गोयंका यांनी २३ मार्च रोजी हा व्हिडिओ पोस्ट केला होता. तो आतापर्यंत ५.७ मिलीयनहून अधिक लोकांनी पाहिला आहे, तर तो ८,४२५ लोकांनी लाईक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The speeding car suddenly swerved by the driver and crashed directly into the truck video went viral jap

First published on: 25-03-2023 at 15:00 IST
Next Story
चक्क हवेत तरंगतोय दगड? व्हायरल फोटोमागील वास्तव समजल्यावर तुम्हीही व्हाल थक्क