scorecardresearch

Premium

VIDEO : ‘या’ दुकानातील चूल १९४९ सालापासून एकदाही नाही विझली, दूध विक्रेत्याचा दावा ऐकून नेटकरी झाले थक्क

सध्या एका दुकानाबाबत अनोखा दावा केला जात आहे. सांगितलं जात आहे की, या दुकानातील चूल १९४९ सालापासून पेटती आहे ती कधीही विझलेली नाही.

Rajasthan Doodh Mandir shop Viral Video
'या' दुकानातील चूल १९४९ सालापासून एकदाही नाही विझली (Photo : ANI, X)

सध्या राजस्थानमधील एका दुकानाबाबत अनोखा दावा केला जात आहे. सांगितलं जात आहे की, येथील एका दुकानातील चूल १९४९ सालापासून पेटती आहे ती कधीही विझलेली नाही. राजस्थानच्या जोधपूरमध्ये हे दुकान असून या दुकान उघडल्यापासून दुकानातील चूल विझली नसल्याचा दावा केला जात आहे. सध्या या दुकानाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ही घटना व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील सोजती गेटजवळ असलेल्या एका दुधाच्या दुकानाच्या मालकाने असा दावा केला आहे की, दूध गरम करण्यासाठी वापरली जाणारी चूल १९४९ पासून जळत आहे. दुकानाचे मालक विपुल निकुब म्हणाले, “माझ्या आजोबांनी १९४९ मध्ये पेटवलेली चूलीची ही ज्योत १९४९ पासून आजपर्यंत चालू आहे.”

Thieves stole AC from medical
यांचा काही नेम नाही! नागपुरातील मेडिकलच्या शल्यक्रिया गृहातून चोरट्यांनी एसी पळवले…
After Shreyas Iyer was ruled out of Ranji Trophy 2024 due to back pain, the NCA made waves the next day by declaring him fit.
Ranji Trophy 2024 : रणजीपासून दूर राहण्यासाठी श्रेयसची पाठदुखीची खोटी तक्रार? एनसीएकडून पूर्णपणे तंदुरुस्त घोषित
Man finds worm crawling in orange he bought from Zepto Company issues refund
Zeptoवरून मागवलेल्या संत्र्यामध्ये व्यक्तीला सापडली जिवंत अळी! पाहा, कपंनीने मागितली माफी
nirmala sitaraman
चांदनी चौकातून: ही गळचेपी तर नव्हे?

हेही वाचा- १५ सेकंदात मुलांनी केली २ लाखांची चोरी, चालत्या बाईकवरील पैशांची पिशवी हिसकावली, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

दुकानदाराचा दावा ऐकून नेटकरी आश्चर्यचकित –

एका सोशल मीडिया युजरने प्रश्न विचारला, “लॉकडाऊन दरम्यान हे दुकान चालू होते का?” त्यावर दुसऱ्या एकाने सांगितले, “या जागेचे नाव दूध मंदिर असून ते दोन भाऊ चालवतात. तर आतली गोष्ट अशी आहे की, एक भाऊ सोमवार, बुधवार, शुक्रवारचे पैसे घेतो, तर दुसरा भाऊ मंगळवार आणि शनिवारचे पैसे घेतो.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “मी या दुकानातील दूध प्यायलो आहे, इथे शुद्ध दूध मिळते पण चूलीबद्दलची गोष्ट मला माहिती नव्हती.”

सजेश कुमार नावाच्या युजरने लिहिलं, “दुकानदार खोटं बोलत आहे, जो लॉकडाऊनमध्ये कोण दूध प्यायला यायचं?” तर दुसऱ्याने लिहिलं, “हे कसे होऊ शकते? कोविड काळात हे दुकान बंद झाले नाही का?” एएनआयशी बोलताना दुकानदाराने सांगितलं, त्यांचे दुकान दररोज २२ ते २४ तास चालते. दूध पारंपारिकपणे कोळसा आणि लाकडाच्या साह्याने गरम केले जाते, दुकानाला सुमारे ७५ वर्षे झाले असून त्यांची कतिसरी पिढी ते चालवते.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The stove of this shop has been burning continuously since 1949 the claim of the shopkeeper selling hot milk rajasthan jap

First published on: 03-12-2023 at 14:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×