Viral News: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर नेहमीच विविध पोस्टर, शाळेतील मुलांच्या पेपरातील उत्तरं, गाड्यांच्या मागचे हटके डायलॉगही प्रचंड व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. सध्या अनेकदा सोशल मीडियावर व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सदेखील व्हायरल होत असतात, ज्यातील मजेशीर चॅट प्रचंड चर्चेत येतात. अशातच आता एका शिक्षक आणि विद्यार्थ्याचे चॅट व्हायरल होत आहे, जे वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शालेय दिवस खूप अनमोल असतात. शाळेतील शिक्षक, त्यांचा मार, त्यांची शिकवणी सर्व गोष्टी कधीही न विसरण्यासारख्या आहेत. नुकताच शिक्षक दिन पार पडला. यानिमित्त अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकांचा सन्मान केला जातो, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका शिक्षक आणि विद्यार्थ्याचे गमतीशीर चॅट्स पाहायला मिळत आहे.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
st bus video viral
सीट पकडण्यासाठी आप्पा थेट खिडकीवर चढले, प्रवासी अन् कंडक्टर पाहतच राहिले, एसटी बसचा Video होतोय व्हायरल

या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावर शिक्षक त्याला धन्यवाद म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी शिक्षकाला त्यांचा फोटो पाठवण्यासाठी सांगतो, यावर शिक्षक त्याला का? असं विचारतात. यावर तो विद्यार्थी सर तुमचा स्टेटस ठेवायचा आहे असं म्हणतो. यावर त्याचे शिक्षक खूप गमतीशीर उत्तर देतात. ते म्हणतात की, “राहूदे बाळा, लोकांना जर कळालं की, तू माझा विद्यार्थी आहेस तर माझा क्लासच बंद होईल.” सध्या हे चॅट खूप व्हायरल होत आहे.

हा फोटो X (ट्विटर) वरील @Marwadi या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “सर तुला चांगलंच ओळखतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “सर जोमात आणि विद्यार्थी कोमात”, तर आणखी काही युजर्स यावर हसताना दिसत आहेत.

हेही वाचा: खतरनाक! बैलाला थांबवणं पडलं महागात, थेट शिंगाने उडवलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नपत्रिकेचा एक फोटो व्हायरल झाला होता; ज्यात लग्नात कृपया दारू पिऊ नका, असा मेसेज लिहिण्यात आला होता. ही हटके पत्रिका सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. त्याशिवाय याआधी एका मुलाचा शाळेतील पेपरचा फोटोदेखील व्हायरल झाला होता.