पाळीव प्राण्यांप्रमाणे वाघाला फिरायला घेऊन आली बोटीवर; पुढे जे झाले ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

या व्हिडीओमध्ये आपण वाघासोबत एक महिला बोटीवर बसलेली पाहू शकतो. ही महिला त्या वाघाला अजिबात घाबरत नाही आहे.

The tiger was brought to the boat like a pet
(Photo : Instagram/@mokshabybee_tigers)

अनेकदा सुट्टीच्या वेळी बहर फिरायला जातो. जर तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी असेल तर तुम्ही त्यालाही आपल्यासोबत घेऊन जात असाल. काही लोक पाळीव कुत्रे आणि काही पाळीव मांजरांना त्यांच्यासोबत फिरायला घेऊन जातात, पण तुम्ही कधी वाघाला माणसांसोबत फिरताना पाहिले आहे का? सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण वाघासोबत एक महिला बोटीवर बसलेली पाहू शकतो. ही महिला त्या वाघाला अजिबात घाबरत नाही आहे. हा व्हिडीओ जुना असला तरीही लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की एका महिलेने वाघाला छोट्या बोटीवर बसवले आहे. ती महिलाही त्याच बोटीवर बसून नदीत पॅडल मारत बोट चालवत आहे. पुढे बसलेला वाघ पाण्याकडे पाहत आहे, तर बाई हसत हसत पॅडल मारत आहे. वाघाने एक पाय पाण्यात टाकला असून तो या राइडचा आनंद घेत आहे. या महिलेच्या चेहऱ्यावर वाघाची भीती नाही.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

सोशल मीडियावर लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर mokshabybee_tigers नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘Adventure, Bonding, Life of Pi.’ इतर अनेक युजर्सनीही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हे माझे स्वप्न आहे.’ तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘खऱ्या आयुष्यातील लाइफ ऑफ पाय.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The tiger was brought to the boat like a pet you too will be shocked to see what happened next pvp

Next Story
Ratan Tata News: टाटा नॅनोमध्ये बसून VVIP ट्रिटमेंट न घेता रतन टाटा पोहोचले ताज हॉटेलला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी