रस्त्यावरून चालताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही वाहन चालवत असाल तरीही काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा अपघात होऊ शकतात. रोज किती रस्ते अपघात होत आहेत हे तुम्ही बातम्यांमध्ये वाचले असेलच. गेल्या वर्षीच्या जागतिक बँकेच्या अहवालात असे आढळून आले आहे की रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होतात. त्यामुळे, विशेषत: रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पिकअप ट्रक मागून आला आणि ट्रॅक्टर चालकाला धडकला. व्हिडीओ पाहून ट्रॅक्टर चालकाची चूक नव्हती असे दिसते. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, ट्रॅक्टर रस्त्यावरून स्वतःच्या वेगाने जात आहे, तर एक ट्रक त्याच्या मागे आहे आणि नंतर त्याला जोरदार धडक देतो. हा व्हिडीओ धक्कादायक आहे, कारण ट्रक चालकाने डाव्या बाजूने भरधाव वेगात ट्रॅक्टरला धडक दिल्याने वाहन उलटले.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
loksatta explained article, crude oil price, hike, Iran Israel conflict, india, on petrol diesel prices
विश्लेषण : इराण-इस्रायल संघर्षातून खनिज तेलाचा भडका… भारतात निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ?
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

(हे ही वाचा: हाच आहे सर्वधर्म समभाव! शाहरुख खानचा मॅनेजरसोबत अंत्यदर्शनावेळी प्रार्थना करतानाचा फोटो व्हायरल)

(हे ही वाचा: Viral: बिबट्याचा ‘हा’ व्हिडीओ पाहून लोकांचे धाबे दणाणले!)

ट्रॅक्टर चालकाची स्थिती कळू शकली नाही

अपघातातील ट्रॅक्टर चालकाची प्रकृती कळू शकली नाही. मात्र, अपघाताच्या तीव्रतेवरून तो जखमी झाला असावा, असे समजते. धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर jayesh_jangid_rj04 या नावाने शेअर करण्यात आला आहे, ज्याचे कॅप्शन आहे – ”सावधानी हटी दुर्घटना घटी’.

(हे ही वाचा: स्वप्नात ‘या’ ५ गोष्टी दिसणे देतात धन प्राप्तीचे संकेत!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला आतापर्यंत ८.२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि ३.५ दशलक्षाहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ट्रॅक्टर चालकाचा विनाकारण मृत्यू झाला असावा. तर दुसर्‍या वापरकर्त्याने कमेंट केली की ट्रॅक्टर चालक धोकादायक अपघातातून वाचला नसेल. मात्र, एका यूजरने असे लिहिले की, ‘कदाचित ब्रेक निकामी झाले असावेत, तेव्हाच ट्रकचालक पुन्हा पुन्हा हॉर्न वाजवत होता.’