scorecardresearch

Uber ड्रायव्हरने दिला असा रिप्लाई, महिलेला कॅबची बुकिंग रद्द करावी लागली; वाचून तुम्हीही थक्क व्हाल

एका ड्रायव्हरने राईड रद्द करण्याचं दिलेलं कारण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

viral Uber driver Reply
सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ड्रायव्हर राईड कसे नाकारतात हे दाखवलं जातं. (Photo : Loksatta, Twitter)

ऑफिसमधून घरी जाताना किंवा कामानिमित्त एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर अनेकवेळा कॅब किंवा ऑटो बुक करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. कधीकधी योग्य वेळेत कॅब बुक होत नाही, तर कधी बुक केलेली कॅब अचानक रद्द केली जाते. शिवाय अनेकदा राईड मिळाली तरी ड्रायव्हर तुमच्या ठिकाणापर्यंत वेळेत पोहोचेलच याची शाश्वतीही नसते. अशा अनेक समस्यांचा नागरिकांना सामना करावा लागतो.

शिवाय सोशल मीडियावर अशा अनेक पोस्ट व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ड्रायव्हर चॅट बॉक्समध्येही ट्रिप कसे नाकारतात हे दाखवलं जातं. त्यापैकी काही पोस्ट मजेदार असतात तर काही विश्वासू ड्रायव्हरही असतात. नुकतेच एका प्रामाणिक ड्रायव्हरने एका ग्राहकाची राईड रद्द केली आहे. मात्र, त्याने राईड रद्द करण्याचं भन्नाट आणि प्रामाणिक असं कारण दिलं आहे. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा आणि मनोरंजनाचा विषय ठरत आहे.

हेही पाहा- दारु वाईटच…! नशेत दोन मित्र थेट लिफ्टच्या दरवाजातून खाली कोसळल्याचा धक्कादायक Video होतोय व्हायरल

आशी नावाच्या एका महिलेला बेंगळुरूमध्ये राईड बुक करायची होती. यासाठी तिने उबेरची सेवा निवडली. यावेळी तिची राईडची विनंती स्विकारली गेली पण कॅब ड्रायव्हरने त्यांची ही राईड स्विकारल्यानंतरही चॅट बॉक्समध्ये नाकारली शिवाय त्याने याचं कारणही सांगितलं. त्याने लिहिलं आहे की, ‘मी कालच्या एका राईडमुळे थकलो आहे, त्यामुळे मी तुमच्या आनंदात अडथळा आणू इच्छित नाही.’ त्याने असा रिप्लाई दिल्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक केलं आहे. तर अनेकांनी यावर वेगवेगळी मिम्सही तयार केली जात अशून आशी यांच्या ट्विटच्या कमेंटबॉक्समध्ये पाहायला मिळत आहे.

हेही पाहा- “बाप तो बापच” रेल्वे स्टेशनवर मुलाला निरोप द्यायला आलेल्या वडिलांचा भावूक Video पाहून नेटकरीही भारावले

हे ट्विट @ashimhta नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ट्विट वाचून तुम्हालाही हसू आवरणं कठिण होणार आहे. शिवाय या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने हा ड्रायव्हर खूप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने मी रोज सकाळी मला झोपायचं आहे काल कंटाळा आला होता, असं म्हणत असतो अशी मजेशीर कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 12:05 IST
ताज्या बातम्या