The video of grandfather using goats to drive the car went viral | Loksatta

…अन् आजोबांनी चक्क शेळ्यांनाच गाडीला जुंपलं, देशी जुगाडाचा Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या देशी जुगाडाचे व्हिडीओ शेअर केले जातात

desi jugaad video
व्हिडिओमधील आजोबांचे जुगाड पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. (Photo : Instagram)

आपल्या देशात वेगवेगळी जुगाड करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सोशल मीडियावर दररोज असे काही व्हिडीओ शेअर केले जातात ज्यामध्ये आपणाला नवनवीन जुगाड पाहायला मिळतात. सध्या अशाच एका भन्नाट जुगाडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हो कारण आजपर्यंत तुम्ही बैलगाडी, घोडागाडी अशा विविध प्रकारच्या गाड्या पाहिल्या असतील शिवाय त्यातून प्रवासही केला असेल पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला चक्क शेळ्यांची गाडी पाहायला मिळणार आहे.

अनेकदा लोक देशी जुगाड वापरून अशा काही गोष्टी बनवतात, जे पाहून नेटकरी आश्चर्यचकित होतात. शिवाय अशा जुगाडांचे व्हिडीओ नेटकऱ्यांनाही आवडत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओदेखील नेटकऱ्यांना आवडला असून ते या व्हिडीओतील आजोबांचे कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एका आजोबांनी जुगाडातून एक भन्नाट अशी गाडी बनवली आहे आणि त्यावर आरामात बसून प्रवास करत आहेत.

हेही पाहा- बापरे! रुग्णाची शस्त्रक्रीया सुरु असतानाच डॉक्टरांमध्ये जुंपली, ऑपरेशन थिएटरचा Video पाहून धडकीच भरेल

व्हिडिओमध्ये आजोबांनी दोन शेळ्या आणि काही लाकडांचा वापर करून एक अनोखी अशी गाडी बनवल्याचं दिसत आहे. शिवाय या छोट्या गाडीत बसून ते प्रवासही करत आहेत. शेळ्यांना गाडीला जुंपल्याचं पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. या भन्नाट देशी जुगाडाचा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला असून ते या व्हिडीओतील आजोबांचे कौतुक करत आहेत. तर काही लोकांनी कमेंट बॉक्समध्ये या व्हिडीओवर टीकाही केली आहे.

हेही पाहा- Video: चोरीचा ट्र्क भरधाव वेगात जाताना रस्त्यातच झाला पलटी; पोलीस येताच ट्र्कने उलटी उडी घेतली अन्..

शेळ्यांचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर ‘lswarmal’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत १० लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर एक लाखांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 10:25 IST
Next Story
Central Bank of India मध्ये बंपर भरती; दरमहा ८०,००० पेक्षा जास्त असेल पगार