पत्नी म्हणते ‘दाढी काढा नाही तर घटस्फोट देईल’, नवऱ्याची पोलिसांकडे धाव

जून २०२० मध्ये त्यांचे लग्न झाले होते. पत्नी म्हणते – मी एक मॉडर्न मुलगी आहे. मला क्लीन शेव्ह नवरा हवा आहे.

marriage break
बायकोला क्लीन शेव्हन नवरा हवा (फोटो: प्रातिनिधिक )

उत्तर प्रदेशातील अलीगढमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. जिथे नवऱ्याच्या दाढीमुळे पत्नीने घटस्फोट देईल असं सागितलं आहे. याबाबत पीडित पती पोलीस अधिकाऱ्याकडे कैफियत मांडत आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाईचे आश्वासन दिले आहे. गुन्हा दाखल झालेला नाही. पीडित इमामच्या तक्रारीवरून पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाची बरीच चर्चाही होत आहे.

बायको मॉडर्न- क्लीन शेव्हन नवरा हवा

वास्तविक, एक इमाम एसएसपीकडे विवाह वाचवण्याची विनंती करण्यासाठी आला होता. त्याने उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याच्या पत्नीने आपल्याला घटस्फोट देण्याची धमकी दिली असून त्याचे कारण दाढी आहे. पत्नी दाढी कापण्यासाठी दबाव आणत आहे. इमामच्या म्हणण्यानुसार, जून २०२० मध्ये त्यांचे लग्न झाले होते. बायको म्हणते – ती एक मॉडर्न मुलगी आहे. तिला क्लीन शेव्ह नवरा हवा आहे. नवरा म्हणतो – मी धार्मिक ठिकाणी इमाम आहे. दाढी काढू शकत नाही.

( हे ही वाचा: लग्नपत्रिकेत Marriage Act आणि संविधानाची कलमं लिहली; वकिलाची पत्रिका झाली व्हायरल! )

दाढीच्या प्रकरणामुळे कुटुंबाची शांतता भंग पावली

पीडितेच्या म्हणण्यानुसार, पत्नी सतत दाढी केली नाही तर त्याला धमकावत असते. स्वत:च्या संगोपनाचा उल्लेख करून ती म्हणते – जर तू दाढी केली नाहीस तर मी तुझ्यासोबत राहणार नाही. मला घटस्फोट घ्यायचा आहे. पत्नी सतत दाढी केल्याचे बोलून लग्न मोडण्याची धमकी देत ​​असते. दाढीमुळे कुटुंबातील शांतता भंग पावल्याची परिस्थिती आहे. बायको त्याच्याशी आणि सासूशी भांडत राहते.

( हे ही वाचा: बाबा ७५ लाखांचा हुंडा नको, त्यापेक्षा मुलींसाठी वसतीगृह बांधा; वडिलांनी पूर्ण केली मुलीची इच्छा )

विवाह वाचवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा – पीडित

तक्रार घेऊन एसएसपी कार्यालयात पोहोचलेले इमाम त्यांना भेटू शकले नाहीत. इमामने तेथे उपस्थित इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लग्न वाचवण्याची विनंती केली. वेळीच पुढाकार घेतला नाही तर आपले लग्न मोडेल, असे त्याने म्हटले आहे. त्यांना न्याय हवा आहे. तो पत्नीशिवाय जगू शकत नाही. आता पोलिसांनी पुढाकार घेऊन हे लग्न वाचवावे. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून बोलणी होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The wife says if you dont shave you will get a divorce the husband runs to the police ttg

ताज्या बातम्या