scorecardresearch

Premium

प्राण्यांना जीव लावणारी माणसं! महिलेने रेड्याला पाजलं पाणी… Video पाहून आयएफएस अधिकारी यांनी दिला मोलाचा सल्ला

जंगलातील तहानलेल्या रेड्याला एका महिलेने न घाबरता चार घागरी पाणी दिलं आहे; हे बघून अनेक जण तिचं कौतुक करताना दिसून आले आहेत.

The woman gave water to the thirsty animal without fear
(सौजन्य:ट्विटर/@sudhaRamenIFS) प्राण्यांना जीव लावणारी माणसं ! महिलेने रेड्याला पाजलं पाणी… Video पाहून आयएफएस अधिकारी यांनी दिला मोलाचा सल्ला

पाणी हे जीवन आहे, ‘पाण्यासाठी कधी कोणाला नाही म्हणू नये’ हे वाक्य लहानपणापासून अनेकदा आपण ऐकलं असेल. घरात पाहुणे आले किंवा एखादा व्यक्ती पार्सल घेऊन आणि तो दमलेला दिसला, तर आपण लगेच त्याला एक ग्लास पाणी देतो. तर आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात जंगलातील तहानलेल्या रेड्याला एका महिलेने न घाबरता चार घागरी पाणी दिलं आहे; हे बघून अनेक जण तिचं कौतुक करताना दिसून आले आहेत.

व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. महिलेच्या घरासमोर एक रेडा उभा आहे आणि त्याला तहान लागली आहे. तसेच महिला न घाबरता भांड्यात त्याला पिण्यास पाणी देते. तसेच तहानलेला रेडा शांतपणे भांड्यात दिलेलं पाणी पिताना दिसतो आहे. व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, महिला फक्त एकदा पाणी देऊन निघून जात नाही, तर रेड्याचे पाणी पिऊन झाल्यानंतर ती पुन्हा रिकाम्या झालेल्या भांड्यात घागर भरून पाणी ओतताना दिसते आहे. गावाकडची माणसं कशाप्रकारे प्राण्यांना जीव लावतात हे या व्हिडीओत दिसून आले आहे. रेड्याला न घाबरता पाणी देणाऱ्या महिलेचा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…

Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
children stealing mobile phones nagpur
नागपूर : लहान मुले मोबाईल चोरी करायचे अन म्होरक्याला नेऊन द्यायचे…
Farmers protest
शंभू सीमेवर धडकलेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीच्या वेशीवर तणाव
gobi manchurian marathi news, gobi manchurian banned in goa
एकट्या मंचुरियननेच यांचं काय बिघडवलंय?

हेही वाचा… ती न्यायाधीश अन् तो गुन्हेगार…! शाळेतले दोन मित्र-मैत्रिणी जेव्हा असे समोरा-समोर येतात; VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

व्हिडीओ नक्की बघा :

महिलेची दया पाहून कराल कौतुक :

गावाकडे राहणाऱ्या स्थानिक लोकांना वन्य प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे लागते. प्राण्यांना जंगलात अन्न पाणी मिळाले नाही की, अनेकदा वन्य प्राणी अन्न पाण्याच्या शोधात स्थानिक लोकांच्या घरांच्या आसपास वावरताना दिसतात. तर या व्हिडीओतसुद्धा असंच काहीसं पहायला मिळालं आहे. रेडा या प्राण्याला तहान लागलेली असते म्हणून तो महिलेच्या घरापाशी उभा आहे आणि महिला रेडा या प्राण्याला चार घागरी भरून पाणी प्यायला देते. तसेच सुरक्षित अंतरसुद्धा ठेवते, जे तुम्ही व्हिडीओत पाहिलं असेल. तसेच आयएफएस (IFS) अधिकारी सुधा रमन यांनी हा व्हिडीओ पाहून एक मोलाचा संदेश दिला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी यांच्या @sudhaRamenIFS अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून वन्य प्राण्यांबद्दल सहानुभूती असणे गरजेचं आहे. परंतु, आपण हे कधीही विसरू नये की, वन्य प्राण्यांना पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवले जाऊ शकत नाही. त्यांच्यापासून अंतर राखणे नेहमीच सुरक्षित असते. असा मोलाचा आणि महत्वाचा संदेश त्यांनी या पोस्टमधून दिला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक जण महिलेचे कौतुक करताना आणि विविध प्रतिक्रिया देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The woman gave water to the thirsty animal without fear asp

First published on: 08-10-2023 at 18:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×