scorecardresearch

ऐकावं ते नवलच! महिलेला जडलंय भिंत खाण्याचं व्यसन; आठवड्याला खाते ‘इतके’ फूट भिंत

या महिलेचे म्हणणे आहे की तिने हे व्यसन सोडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिला यश आले नाही.

woman-eat-3-feet-wall-in-a-week
लहानपणी खडू खाण्याची तिची सवय आता भिंत खाण्याच्या व्यसनामध्ये रूपांतरित झाली आहे. (प्रातिनिधिक फोटो : Pexels)

लहापणीच जडलेल्या अनेक सवयी तारुण्यापर्यंतच नाही तर म्हातारपर्यंत आपला माग सोडत नाही. अशातच जर ही सवय वाईट असेल तर अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशीच एक घटना एका महिलेसोबत घडली आहे. ती तिच्या सवयीमुळे हैराण झाली आहे. तिची लहानपणीची सवय आता व्यसन झाले आहे आणि हे कोणतेही साधेसरळ व्यसन नाही. लहानपणी खडू खाण्याची तिची सवय आता भिंत खाण्याच्या व्यसनामध्ये रूपांतरित झाली आहे.

माहितीनुसार ही महिला आठवड्यात ३ फुटांपर्यंत भिंत खाते. या महिलेचे म्हणणे आहे की तिने हे व्यसन सोडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिला यश आले नाही. महिलेच्या या व्यसनामुळे तिला गंभीर आजार होण्याचा इशारा डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

तुम्हाला OK चा फुलफॉर्म माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक तथ्ये

ही कहाणी आहे अमेरिकेतील मिशिगन येथील रहिवासी असलेल्या निकोलची. निकोलला लहानपणी खडू खायला खूप आवडायचे. पूर्वी तिला खडू खाण्याची सवय होती. मग त्याचे व्यसन होऊन ती भिंतीकडे वळली. निकोलला वेगवेगळ्या भिंतींची चव घेणे आवडते. निकोलने टीएलसीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली आहे. या व्यसनाचे वर्णन करताना तिने सांगितले की, आईच्या मृत्यूनंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. यानंतर तिला खडू खाण्याची सवय लागली आणि बघता बघता ही सवय आता भिंत खाण्यापर्यंत पोहोचली आहे. आता ती आठवड्यातून तीन चौरस फूट भिंत खाते. निकोल एका मुलाची आई देखील आहे. निकोल केवळ तिच्या घराच्या भिंतीच नाही तर शेजारी आणि नातेवाईकांच्या घरांच्या भिंती देखील खाते. त्यामुळे तिचे शेजारी आणि नातेवाईक तिच्यावर प्रचंड नाराज आहेत.

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

या व्यसनाबद्दल निकोल स्वतःला असहाय्य समजते. निकोलच्या व्यसनाबद्दल डॉक्टरही गंभीर आहेत. त्याने निकोलला इशाराही दिला आहे. जर निकोलने भिंत खाणे थांबवले नाही तर तिला कर्करोग होऊ शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे. भिंतींमधील रंगरंगोटीतील रसायनांमुळे तिला इतर अनेक गंभीर आजारही होऊ शकतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The woman is addicted to eating the wall eats 3 foot wall per week pvp