नशीब चांगले असेल तर बिकट परिस्थितीतून बाहेर पडतात, पण नशीब खराब असेल तर काहीही होऊ शकत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतील. अशा व्हिडीओमध्ये अनेकदा एखादी व्यक्ती मरता मारता वाचतात. असाच काहीसा प्रकार एका व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळाला, जेव्हा एका बस चालकाने झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा जीव वाचवला, मात्र तिच बस भिंतीवर आदळली. या घटनेमुळे बसमध्ये बसलेले अनेक जण जखमी झाले.
‘अशी’ बचावली महिला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी डबल डेकर बसने ईशान्य लंडनमधील एका दुकानाला धडकण्याच्या काही क्षण आधी, झेब्रा क्रॉसिंगवर एका महिलेला धडकणे टाळले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हायम्स पार्कमधील सेल्विन एव्हेन्यू येथे डबल डेकर बसचा अपघात झाला.ब्रॉडवेवरील ‘द कॉर्नर कॅफे’ च्या बाहेर रस्ता ओलांडत असताना एका महिलेला बसने धडक दिल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. बस व्हाईट गुड्स स्टोअरला धडकण्यापूर्वी काही मिनिटे आधी हा अपघात झाला. वैद्यकीय पथकाने घटनास्थळी १९ रुग्णांवर उपचार केले.




(हे ही वाचा: एका बाजूला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी; ड्रायव्हरचा यू-टर्न घेतानाचा Video Viral)
(हे ही वाचा: विकेट घेताच ड्वेन ब्रावोने ‘पुष्पा’ स्टाईलने केला डान्स, सेलिब्रेशनचा Video Viral)
काय म्हणाले प्रत्यक्षदर्शी
झेब्रा क्रॉसिंगवर बसने एका महिलेला धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेज कॅफेचे मालक एरिक गॅरीप यांनी शेअर केले होते. घटनेच्या काही मिनिटांनंतर, महिला कॉफी शॉपमध्ये गेली होती आणि तिला भयंकर धक्का बसला होता.