scorecardresearch

The world’s best airport: ‘हे’ ठरलं जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ, मात्र भारताला रँकिंगमध्ये स्थान नाही

world’s best airport जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचं नाव जाहीर, जागतिक स्तरावर भारतातील कोणत्याही विमानतळाला सर्वोच्च 20 रँकिंगमध्ये स्थान मिळवता आलं नाही.

The world’s best airport
सिंगापूरचं चांगी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ (photo Source: Pixabay)

The world’s best airport सिंगापूरचं चांगी जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलं आहे. सिंगापूरचं चांगीने पुन्हा आपली जागा मिळवत कतार आतंराष्ट्रीय विमानतळाला मागे टाकलं आहे. तर 2021 आणि 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले आशियाई हब दोहा हमाद आंतराष्ट्रीय विमानतळानं यावर्षी दुसरा क्रमांक मिळवलाय. टोकियोच्या हनेद विमानतळाने स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स २०२३ मध्ये शेवटचे तिसरे स्थान मिळवले आहे. दरम्यान अमेरिकेतील कोणतेही विमानतळ पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवू शकलेलं नाही. पॅरिस चार्ल्स डी गॉल हे युरोपमधील सर्वोच्च परफॉर्मर होते, हे एका स्थानानं वर पोहचून पाचव्या क्रमांकावर आले आहेत. तर सिएटल-टॅमोका आंतरराष्ट्रीय विमानतळ हे उत्तर अमेरिकेतील सर्वोच्च क्रमांकाचे विमानतळ होते, जे यंदा 18 व्या स्थानावर आहे.

चांगी विमानतळाला १२वेळा पुरस्कार –

चांगी विमानतळाला १२वेळा जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती चांगी विमानतळ समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ली सेव हियांग यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षात कोरोनोच्या आव्हानांचा सामना करण्यसाठी खंबीरपणे एकत्र उभे राहिलेल्या आमच्या विमानतळ समूहाला हा सन्मान खूप प्रोत्साहन देणारा आहे.

२०२२ तसेच २०२३ ची ‘ही’ जगातील सर्वोत्तम विमानतळे –

सिंगापूर चांगी
दोहा हमद
टोकियो हानेडा
सोल इंचॉन
पॅरिस चार्ल्स डी गॅले
इस्तंबूल
म्युनिक
झुरिच
टोकियो नारिता
माद्रित बराजस
व्हिएन्ना
हेलसिंकी-वांता
रोम फियुमिसिनो
कोपनहेगन
कानसाई
सेंट्रेंर नागोया
दुबई
सिएटल-टॅकोमा
मेलबर्न
व्हँकुव्हर

हेही वाचा – ‘यमराजने भेजा है बचाने के लिए…’ म्हणत एक्सप्रेस वेवर पळवली कार अन् झालं असं काही

दरम्यान जागतिक स्तरावर भारतातील कोणत्याही विमानतळाला सर्वोच्च 20 रँकिंगमध्ये स्थान मिळवता आलं नाही. तर दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून पुरस्कार मिळाला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 19:02 IST
ताज्या बातम्या